Cristiano Ronaldo SAAM TV
Sports

Cristiano Ronaldo : रोनाल्डोला २४ तासांत दुसऱ्यांदा जोरदार दणका; २ सामन्यांची बंदी, ५० लाखांचा दंड

रोनाल्डोवर २ सामन्यांंची बंदी घातली आहे. या कारवाईमागचं कारण काय?

Nandkumar Joshi

Cristiano Ronaldo News : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो सध्या कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करत आहे. त्याचवेळी रोनाल्डोसाठी वाईट बातमी आली आहे. इंग्लंडच्या फुटबॉल असोसिएशननं त्याच्यावर ४९ लाख रुपयांचा दंड आणि दोन सामन्यांची बंदी घातली आहे. रोनाल्डोसाठी मागील २४ तासांतील ही दुसरी वाईट बातमी आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डो हा पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू आहे. जगभरात त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. स्वतः रोनाल्डो आणि त्याच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. या वर्षी एप्रिलमध्ये चाहत्यासोबत गैरवर्तन केल्याच्या कारणास्तव त्याच्यावर इंग्लंडच्या फुटबॉल असोसिएशननं ४९ लाख रुपयांचा दंड आणि दोन सामन्यांची बंदी घातली आहे. (Sports News)

यावर्षी एप्रिलमध्ये एका सामन्यादरम्यान पराभवानंतर रोनाल्डो (Cristiano Ronaldo) मैदानाबाहेर जात होता. त्यावेळी त्यानं एका चाहत्याच्या हातावर फटका मारून त्याच्याजवळील फोन पाडला होता. या प्रकारानंतर रोनाल्डोवर प्रचंड टीका झाली होती. चाहत्यासोबत गैरवर्तन केल्याच्या या प्रकारानंतर त्याच्यावर फुटबॉल असोसिएशननं कारवाई केली आहे.

या प्रकारानंतर रोनाल्डोवर टीका झाली होती. त्यानंतर रोनाल्डोनं स्वतः सोशल मीडियावरून चाहत्याची माफी मागितली होती. मात्र, तरीही त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. फुटबॉल असोसिएशननं त्याच्यावर ५० हजार पाउंड म्हणजेच जवळपास ४९ लाख रुपयांच्या दंडाची कारवाई केली आहे. याशिवाय त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली आहे.

दरम्यान, याआधी जवळपास २४ तास आधीच रोनाल्डोनं एक घोषणा केली होती. मँचेस्टर युनायटेड क्लबपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले होते. ब्रिटनच्या पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत त्याने क्लबवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे क्लबच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

रोनाल्डो आता क्लब स्तरावर कोणत्याही संघात नाही. अशात आता वर्ल्डकपमधील त्याच्या कामगिरीवर तो भविष्यात कोणत्या संघाशी जोडला जाणार हे अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT