Fans Chants mumbai cha Raja rohit sharma in Wankhede stadium during mi vs csk match watch video twitter
Sports

Rohit Sharma Viral Video: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा..' वानखेडेवर हिटमॅनच्या फॅन्सचा जयघोष! Video व्हायरल

Mumbai Cha Raja Rohit Sharma Viral Video: मुंबईचे फॅन्स रोहितला सपोर्ट करताना दिसून आले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले. या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र घरच्या मैदानावर खेळताना मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या सामन्यात माजी कर्णधार रोहित शर्माने एकाकी झुंज देत शतकी खेळी केली. दरम्यान मुंबईचे फॅन्स रोहितला सपोर्ट करताना दिसून आले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला. गेली १० वर्ष संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं. त्याच्याऐवजी हार्दिक पंड्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. असं असलं तरीदेखील चाहत्यांच्या मनात रोहित शर्माबद्दल असलेलं प्रेम काही कमी झालेलं नाही.

मुंबई आणि चेन्नईचा सामना हा वानखेडे स्टेडियमवर पार पडला. हे रोहित शर्माचं होम ग्राऊंड देखील आहे. या मैदानावर खेळून तो मोठा झाला आहे. आता कर्णधार नसला तरीदेखील फॅन्सचा त्याला फुल सपोर्ट आहे.

वानखेडेवर ' मुंबईचा राजा रोहित शर्मा'चा जयघोष...

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रोहित शर्मा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करण्यासाठी येताच फॅन्स मुंबईचा राजा रोहित शर्मा'चा जयघोष करताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

मुंबई इंडियन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०७ धावांचा गरज होती. मात्र मुंबईचा संघ या धावांचा यशस्वी पाठलाग करू शकला नाही. मुंबईकडून माजी कर्णधार रोहित शर्माने शतकी खेळी केली. मात्र त्याची ही खेळी व्यर्थ गेली. कारण मुंबईला हा सामना २० धावांनी गमवावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

SCROLL FOR NEXT