Fakhar Zaman Catch Saam tv
Sports

Fakhar Zaman Catch Controversy : एकीकडे अश्रूंच्या धारा, दुसरीकडे वादाचे सूर; भारत-पाकिस्तानच्या दुसऱ्या सामन्यात नवा ड्रामा

Fakhar Zaman Catch Controversy update : भारत-पाकिस्तानच्या दुसऱ्या सामन्यात नवा ड्रामा सुरु झाला आहे. फखर जमांच्या कॅचवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Vishal Gangurde

फखर जमा फक्त १४ धावा करून संजू सॅमसनकडे झेलबाद

तिसऱ्या पंचाने दिलेल्या निर्णयावरून फखर जमा नाराज

सोशल मीडियावर पाकिस्तानच्या चाहत्यांनी पंचांच्या निर्णयावर टीका

भारताच्या पॉवरप्लेमध्ये दोन झेलही सुटले

Fakhar Zaman : आशिया कप २०२५ सुपर ४ सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाज फखर जमा फक्त १४ धावा करून बाद झाला. भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या चेंडूवर फखर जमाचा कॅच संजू सॅमसनने घेतला. फखर जमा झेलबाद झाल्यानंतर आक्षेप घेतला. मात्र, तिसऱ्या पंचाने बाद घोषित केल्यानंतरही चेहऱ्यावर नाराजीचे सूर होते.

फखर जमांच्या बॅटचा कट लागून विकेटकिपर संजू सॅमसनकडे पोहोचला. तिसऱ्या पंचाच्या निर्णयानंतर फखरला धक्का बसला. फखर जमांच्या बॅटचा कट लागून चेंडू हा संजू सॅमसनच्या हातात बसला. चेंडू हा जमिनीवर आदळल्याचा फखरचा दावा होता. मात्र, तिसऱ्या पंचाने फखरला बाद घोषित केलं. त्याने फखरला धक्का बसल्याचं पाहायला मिळालं.

तिसऱ्या पंचाच्या निर्णयानंतर फखर जमा नाराज झाल्याचं दिसून आलं. तंबूत परतल्यानंतर फखर जमां त्यांच्या टीमचा प्रमुख कोच माइक हेसनला तक्रार करताना दिसला. तक्रार करतानाही फखर नाराज असल्याचे चेहऱ्यावर भाव होते.

फखर जमांची विकेटवरून नवा ड्रामा सुरु झाला आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानी चाहत्यांनी फखर जमां बाद नसल्याचं म्हणत पंचाने चुकीचा निर्णय दिल्याचे बोलत आहेत. तर भारतीय चाहते पंचाच्या बाजूने बोलत आहेत. संजू सॅमसनने फखर जमांचा चांगला कॅच घेतला. मात्र, टीम इंडियाच्या पॉवरप्लेमध्ये दोन कॅच सोडले. थर्ड मॅनवर फिल्डिंगसाठी उभ्या असलेल्या अभिषेक शर्माने कॅच सोडली. तर कुलदीप यादवने फाइन लेगवर कॅच सोडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

SCROLL FOR NEXT