पुणे: IPL सामान्यांवरील सट्टाबाजाराचा पर्दाफाश; दोन बुकिंना घेतलं ताब्यात Saam TV
Sports

पुणे: IPL सामान्यांवरील सट्टाबाजाराचा पर्दाफाश; दोन बुकिंना घेतलं ताब्यात

पुणे पोलिसांनी (Pune Police) शहरात सुरू असणाऱ्या IPL सामान्यांवरील सट्टाबाजाराचा पर्दाफाश केला आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे: पुणे पोलिसांनी (Pune Police) शहरात सुरू असणाऱ्या IPL सामान्यांवरील सट्टाबाजाराचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी क्रिकेटवरील आंतरराष्ट्रीय सट्ट्याचा पर्दाफाश करत दोन बड्या बुकींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या कारवाईदरम्यान दोघांकडून तब्बल ९२ लाख रुपयांची रोख रक्कम आणि काही ऐवजही जप्त केला आहे. सट्टाकिंग गणेश भुतडा आणि अशोक देहूरोडकर अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मार्केटयार्ड आणि समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. दोन वेगवेगळ्या पथकांनी एकाच वेळी नाना पेठ आणि मार्केटयार्डमध्ये छापेमारी केली. त्यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली. दोन्ही ठिकाणावर ९२ लाख रुपये रोख आणि ६५ हजार रुपयांचा ऐवज मिळाला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील अनेकांचे धागे हाती लागले आहेत. त्यामुळे या बुकिंबाबत अजून तपास पोलीस करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT