West Indies 195 scorecard vs India T20 Saam TV Marathi
Sports

IND vs WI : मुंबईचं तिकीट फिक्स! पण टीम इंडियासमोर १९६ धावांचा डोंगर; बुमराहचा 'मॅजिक स्पेल' तरीही विडिंज सुसाट!

West Indies 195 scorecard vs India T20 : भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजने १९५ धावांचा डोंगर उभारला. जेसन होल्डर आणि रोवमन पॉवेलच्या तुफानी फिनिशमुळे भारतासमोर १९६ धावांचे आव्हान उभे राहिले असून उपांत्य फेरीसाठी विजय अनिवार्य आहे.

Namdeo Kumbhar

India vs West Indies live score today : टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी टीम इंडियाला १९६ धावांचे आव्हान मिळाले आहे. प्रथम फलंदाजी करताना विडिंजने ४ विकेटच्या मोबदल्यात १९५ धावांपर्यंत मजल मारली. विडिंजकडून अनुभवी जेसन होल्डर, विस्फोटक रोवमन पॉवेल यांनी अखेरच्या ६ षटकांत धावांचा पाऊस पाडला. या जोडीने ३५ चेंडूत नाबाद ७६ धावा जोडल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह याने दोन विकेट घेतल्या. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील विजेता संघ इंग्लंडविरोधात मुंबईच्या वानखेडे मैदानावर उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे.

विडिंजच्या कोणत्या फलंदाजाने किती धावा केल्या?

अनुभवी जेसन होल्डर याने २२ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ३७ धावांचा पाऊस पाडला. तर रॉवमेन पॉवल याने १९ चेंडूमध्ये ३ चौकार आणि २ षटकारांचा पाऊस पाडत ३४ धावांचा पाऊस पाडला. पॉवेल आणि जेसन होल्डर यांनी पाचव्या विकेटसाठी फक्त ३५ चेंडूमध्ये ७६ धावांची नाबाद भागिदारी केली. ही विडिंजकडून सर्वात मोठी भागिदारी ठरली. तर रेस्टन चेज आणि शाई होप यांनी ५३ चेंडूत ६८ धावांची भागिदारी केली. कर्णधार शाई होप याने अतिशय संथ फलंदाजी केली. त्याने ३३ चेंडूत ३२ धावा चोपल्या. यामध्ये ३ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. तर रेस्टन चेस याने २५ चेंडूत ४० धावा केल्या. त्याने एक षटकार आणि ५ चौकार लगावले. हेटमायर याने १२ चेंडूत दोन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने २७ धावा केल्या. शरफन रूदरफोर्ड याला फक्त १४ धावांचे योगदान देता आले.

भारताच्या गोलंदाजाची कामगिरी कशी ?

यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने भेदक मारा केला. त्याने ४ षटकात ३६ धावा खर्च करत २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तर हार्दिक पांड्या आणि वरूण चक्रवर्ती यांनी आपल्या ४ षटकात ४० धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी एक एक विकेट घेतली. तर अक्षर पटेल याने ४ षटकात ३५ धावा खर्च केल्या. अर्शदीप सिंह याने ४ षटकात ४३ धावा खर्च केल्या. त्याने १९ व्या षटकात फक्त ५ धावा खर्च केल्या.

अभिषेक शर्माची खराब फिल्डिंग -

करो या मरोच्या सामन्यात अभिषेक शर्मा याने अतिशय खराब फिल्डिंग केली. अभिषेकने मोक्याच्या क्षणी दोन झेल सोडले. पॉवरप्लेमध्ये पाचव्या षटकात त्याने रेस्टन चेज याचा सोपा झेल सोडला. तर अखेरच्या हाणामारीच्या षटकातही अभिषेकने खराब फिल्डिंग केली. १९ व्या षटकात अभिषेक शर्माने विस्फोटक फलंदाज रॉवमन पॉवेल याचा झेल सोडला. भारतीय खेळाडूंनी रनआऊटची एक संधीही सोडली.

वरूण चक्रवर्तीने विडिंजला दिला पहिला धक्का -

स्टार फिरकी गोलंदाज वरूण चक्रवर्ती याने भारताला पहिली विकेट मिळवून दिला. शाय होप आणि रेस्टन चेज यांनी दमदार सुरूवात केली होती. दोघांनी मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली होती. पण वरूण चक्रवर्ती याने नवव्या षटकात विडिंजला पहिला धक्का दिला. शाय होप ३३ चेंडूत ३२ धावा काढून बाद झाला. चेज आणि होप यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागिदारी केली.

पॉवरप्लेमध्ये विडिंजची सावध सुरूवात -

भारताविरोधातील सुपर-८ सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने दमदार सुरुवात केली. पॉवरप्लेच्या पहिल्या ६ षटकात विडिंजने बिनबाद ४५ धावा केल्या. हार्दिक पांड्या १, अर्शदीप सिंह २, अक्षर पटेल २ आणि जसप्रीत बुमराह याने एक षटक टाकले. जसप्रीत बुमराहच्या षटकात अभिषेक शर्माने रेस्टन चेज याचा सोप्पा झेल सोडला. हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुटुंबातूनच गद्दारी, खामेनींना पडली भारी? खामेनींच्या घरातच अमेरिकेचा खबरी?

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर मढी येथे हिंदू सभेचे आयोजन

दुबईच्या बुर्ज खलिफावर हल्ला? बुर्ज खलिफा केला रिकामा? जगात खळबळ

Nagpur Blast: नागपूरमध्ये स्फोटांची मालिका सुरूच, ३ वर्षांत ४० निष्पापांचा बळी; या घटनांना जबाबदार कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली तातडीची बैठक; दिल्लीत घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT