yuvraj singh - Saav Tv
क्रीडा

सरप्राइज : मी पुन्हा येईन म्हणणा-या युवराज सिंगचा व्हिडिओ व्हायरल

आता युवराज सिंगने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : मी पुन्हा येईन असे महिन्यांपुर्वीच घाेषित करणा-या भारतीय संघातील सिक्सर किंग माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने (yuvraj singh) नुकताच एक नवीन व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांची उत्सुकता ताणली आहे. युवराज सिंगची निवृत्तीतून (retirement) पुनरागमनाची घोषणा करणारी ही पोस्ट देखील आनंदित झालेले चाहते व्हायरल करीत आहेत.

युवराजने नुकताच इंस्टाग्रामवर पुन्हा एकदा व्हिडिओ पोस्ट करून त्याच्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. हीच ती वेळ आहे. तुम्ही तयार आहात ना? तुमच्याकडे जे काही लागेल ते आहे ना? तुम्हा सर्वांना एक मोठे सरप्राईज देणार असल्याचे युवराजने त्याच्या पाेस्टमध्ये लिहिले.

चाहत्यांना सेकंड इनिंगची उत्सुकता

युवराज सिंग याने इन्स्टावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सेकंड इनिंग सुरु करणार असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान युवराज नेमके काय करणार याची गुप्तता त्याने पाळली आहे. त्यामुळे युवराज आता नेमकं काय करणार असा प्रश्न त्याचे चाहते एकमेकांना विचारीत त्याचा व्हिडिओ व्हायरल करीत आहे.

सन २०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेत युवराज सिंगने सर्वोत्तम क्रिकेट खेळले हाेते. विश्वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर त्याला कर्करोग झाल्याचे निदान झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराजने जगभरातील फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळला. त्याने GT20 लीगमध्ये टोरंटो नॅशनल्सचे प्रतिनिधित्व केले आहे. अबू धाबी T10 मध्ये मराठा अरेबियन्सकडून खेळला आहे. मार्च २०२१ मध्ये रोड सेफ्टी मालिकेदरम्यान युवराज शेवटचा मैदानात दिसला होता.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: तिसऱ्या फेरीनंतर बुलढाण्यात कोणत्या मतदारसंघात काय स्थिती?

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

SCROLL FOR NEXT