World cup qualifiers 2025 saam tv
Sports

World cup : जिंकूनही हरले...! वेस्टइंडीजचं नशीबच फुटकं; रन-रेटमुळे भंगलं वर्ल्डकपचं स्वप्न, भर मैदानात धायमोकलून रडल्या खेळाडू

World cup qualifiers 2025: लाहोरमध्ये झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजची टीम जिंकूनही हरली. नेट रन रेटच्या समीकरणारमुळे वेस्ट इंडिज यंदाच्या वनडे वर्ल्डकपमधून बाहेर पडली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आतापर्यंत तुम्ही जिव्हारी लागणार पराभव ऐकला असेल मात्र तुम्ही कधी एखाद्या क्रिकेट सामन्यात जिव्हारी लागणारा आणि मन तोडणाऱ्या विजयाबद्दल ऐकलंय का? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगतो. हा विजय टीमसाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे होता. शनिवारी म्हणजेच १९ एप्रिल रोजी लाहोरमध्ये वेस्टइंडिजच्या महिला टीमसह असंच काहीसं घडलं.

वेस्टइंडिजच्या महिला क्रिकेट टीमने वनडे क्रिकेट सामना ११ ओव्हरपूर्वीच जिंकला. इतकंच काय तर आयसीसी वुमेंस क्रिकेट वर्ल्डकप २०२५ च्या क्वालिफायर्सचा फायनल सामना दखील जिंकला. मात्र अखेरीस भारतात होणाऱ्या आयसीसी वुमेंस क्रिकेट वर्ल्डकप २०२५ चं तिकीट त्यांना मिळू शकलेलं नाही. त्यामुळे हा पराभव वेस्टइंडिज महिलांच्या इतका जिव्हारी लागला की भर मैदानात त्या धायमोकलून रडू लागल्या.

नेट रनरेटने केला वेस्टइंडिजचा गेम

वेस्टइंडिजची महिला क्रिकेट टीम २०२५ चा वर्ल्डकपसाठी क्वालिफाय करण्याच्या मार्गावर होती. समीकरण असं की होतं की, जर वेस्टइंडीजची टीम थायलंडने दिलेल्या १६७ रन्सचं लक्ष्य १० ओव्हर किंवा २ बॉलनंतर पूर्ण करत असती तर बांगलादेशाच्या टीमना नेट रनरेटमध्ये मागे टाकत होती.

दुसरं समीकरण असंही होतं की जर टीम १०.५ ओव्हरमध्ये १६६ रन्सची बरोबरी साधते आणि शेवटच्या बॉलवर सिक्स लगावते तरीही वेस्टइंडीजची टीम वर्ल्डकप खेळण्यासाठी पात्र ठरली असती. परंतु यावेळी नशीबाने त्यांना साथ दिली नाही.

वेस्टइंडिजच्या टीमने तुफान फलंदाजी करत १०.४ ओव्हर्समध्ये १६२ रन्स बनवले होते. वेस्टइंडीजकडून स्टीफन टेलर क्रीझवर होती. तिने पुढच्या बॉलवर सिक्स लगावली आणि सामनाही जिंकला मात्र वर्ल्डकपसाठी पात्र होऊ शकले नाही. बांग्लादेशाचं नेट रन रेट 0.639 होतं आणि वेस्टइंडीजचं नेट रन रेट 0.626 होतं. यामध्ये केवळ 0.013 चं अंतर राहिलं.

वुमेंस वर्ल्ड कप 2025 साठी क्वालिफाय झालेल्या टीम्स

भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूजीलंड, साऊथ अफ्रिका, श्रीलंका, बांग्लादेश आणि पाकिस्तान (क्वालीफायर जिंकून येणाऱ्या २ टीम्स).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT