Iron Man 2022 - ETU European Triathlon Union sportograf
Sports

Sports: महाराष्ट्र पोलीस दलातील पहीला IRONMAN! ट्रायथलॉन स्पर्धेत PI संदीप गुरमे यांनी पटकावला 'आयर्नमॅन'चा पुरस्कार

ETU European Triathlon Union : युरोपमधील इस्टोनियामध्ये झालेली ट्रायथलॉन स्पर्धेत उदगीरच्या पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी पटकावला 'आयर्नमॅन' चा पुरस्कार

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर: युरोपमधील इस्टोनियामध्ये झालेली ट्रायथलॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करीत उदगीर येथील पोलीस निरीक्षक संदीप गुरमे (PI Sandeep Gurme) यांनी 'आयर्नमॅन' हा बहुमान मिळविला. जगभरातील अत्यंत कठिण स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा (Sports) समावेश आहे. अ‍ॅथलेटच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा कस पाहणारी ही स्पर्धा फार कमी स्पर्धक पूर्ण करू शकतात. मागील दोन वर्षांपासून या स्पर्धेची तयारी करणार्‍या श्री. संदीप पांडुरंगराव गुरमे यांनी कठोर मेहनतीने हे यश मिळविले. त्यांनी ही स्पर्धा 7 तास 44 मिनिटे एवढ्या वेळात पूर्ण केली. (ETU European Triathlon Union)

हे देखील पाहा -

युरोपमधील इस्टोनियाची राजधानी टॅलिन येथे ही स्पर्धा पार पडली. 1.9 किलोमीटर समुद्रात पोहणे, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर धावणे हे तीनही क्रीडाप्रकार, साधारण 17 ते 18 अंश सेल्सियस तापमानात एकसलग पूर्ण करावे लागणारी ही स्पर्धा जगातील कठिणतम स्पर्धांपैकी एक समजली जाते. ही स्पर्धा जिंकणे हे तर महाकौशल्याचे काम आहे पण ती पूर्ण करणारे स्पर्धकही खूप कमी असतात.

संदीप गुरमे हे औरंगाबाद येथील एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे, औरंगाबाद येथे कार्यरत असून एक सक्षम पोलिस अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. ते एकेकाळचे गुणवत्ताप्राप्त एनसीसी कॅडेट होते. अ‍ॅथलेटिक्सची त्यांची आवड त्यांनी बालपणापासून जपलेली आहे. निर्व्यसनी व शाकाहारी व्यक्तिमत्त्व असलेल्या संदीप गुरमे यांनी २०१९ मध्ये विरळ ऑक्सिजन असलेल्या मनालीत ४००० फूट उंची ते लेह लडाख खारदूगला १८००० फूट उंचीवर ५५० किमी सायकलिंग करण्याचा विक्रम नोंदविला आहे.

'आयर्नमॅन' स्पर्धेसाठी त्यांनी मागील दोन वर्षांपासून तयारी चालविली होती. वाळूज औद्योगिक वसाहतीतील उद्योजक श्री. अभिजित नारगोलकर हे संदीप गुरमे यांचे ‘कोच’ आहेत. या स्पर्धेसाठीची शारीरिक व मानसिक तयारी श्री. नारगोलकर यांनी करून घेतली. श्री. गुरमे यांनी सरावादरम्यान दररोज 2 तास मेहनत घेतली. दर आठवड्याला 300 किलोमीटर सायकलिंग, 21 किलोमीटर धावणे आणि 7 किलोमीटर पोहणे हा क्रम त्यांनी मागील वर्षभर सांभाळला.

हवाई बेटांवरील रहिवासी असलेल्या ज्युडी आणि जॉन कोलिन्स यांनी 1974 मध्ये सॅन दिएगो येथे झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावरून प्रेरणा घेत त्यांनी 1977 मध्ये ‘सायकलिंग-रनिंग-स्विमिंग’ हे तीनही क्रीडाप्रकार एकत्र असलेल्या स्पर्धेचे प्रथम आयोजन केले. कुठल्याही अ‍ॅथलिटसाठी स्वप्नवत असलेली, त्यांच्या क्षमतांचा कस लागणारी ही स्पर्धा अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. ‘कुठलीही गोष्ट शक्य आहे’ असे ध्येयवाक्य असलेली ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करणार्‍या स्पर्धकाला ‘आयर्नमॅन’ म्हणून गौरवले जाते. दरवर्षी जगभरातून हजारो स्पर्धक यात सहभागी होतात आणि फार कमी ही स्पर्धा पूर्ण करू शकतात. अशा प्रकारे यश संपादन करणारे महाराष्ट्रातील पहिले वरिष्ठ पोलिस निरीक्षक आहेत. त्यांनी वयाच्या ५१ व्या वर्षी आयर्नमॅन ७०.३ ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT