Cricket Commentary saam tv
Sports

Cricket Commentary: 'फलंदाज मारायला गेला वाशीला, पण चेंडू गेला...'; दशरथ पाटील यांची कॉमेंट्री ऐकून पोट धरून हसाल अन् रवि किशनलाही विसराल

cricket entertainment commentary : नेटकऱ्यांमध्ये समालोचक दशरथ पाटील यांच्या खुमासदार शैलीतील कॉमेंट्रीची देखील चर्चा होत आहे.

Vishal Gangurde

Dashrath patil Commentary : आयपीएलच्या १६ व्या हंगामाची सुरुवात झाली आहे. आतापर्यंत या हंगामाचे ६ पेक्षा अधिक सामने झाले आहेत. यंदाचा १६ वा हंगाम अनेक गोष्टीमुळे नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. यंदा आयपीएलची कॉमेंट्री १२ प्रादेशिक भाषेत होत आहे. या हंगामात सर्वाधिक चर्चा भोजपुरी भाषेच्या रवि किशनच्या कॉमेंट्रीची होत आहे. रवि किशनची कॉमेंट्री पाहून काही नेटकऱ्यांमध्ये रायगडभागात खुमासदार शैलीत कॉमेंट्री करणाऱ्या समालोचक दशरथ पाटील यांची चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आणि निमशहरात मोठ्या प्रमाणात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक क्रिकेटपटू (Cricketer) आर्थिक कमाई करत असतात. या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन लाखो रुपये खर्चून करण्यात येते. तर त्याचबरोबर क्रिकेटपटूंवर हजारोंच्या बोली देखील लागतात. या स्पर्धेचा आयोजनाचा थाट फार मोठा असतो.

ठाणे, रायगड आणि पालघरसहित वसई, विरार, वाडा आणि रायगडमधील पनवेल, उरण, तळोजा या परिसरातही मोठ्या प्रमाणात भव्यदिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरवण्यात येतात. तसेच स्पर्धेत लाखो रुपयांची पारितोषिके असतात. या क्रिकेट स्पर्धा दिवाळीनंतर सुरू होतात.

या स्पर्धांचे आता युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण देखील केले जाते. या अशा स्पर्धेमधील कॉमेंट्रीची देखील तेवढीच चर्चा होत असते. त्यात विशेष म्हणजे सोशल मीडियावर चर्चेत असणारे समालोचक दशरथ पाटील यांच्या कॉमेंट्रीचा मोठा चाहता वर्ग आहे.

'फलंदाज मारायला गेला वाशीला, पण चेंडू गेला काशीला', जखम मांडीला आणि इलाज शेंडीला, क्रिकेटचं भविष्य आणि शरद पवारांचं राजकारण कधी कोणाला कळणार नाही, अशा नानाविविध डॉयलॉगबाजीने मैदानातील क्रिकेटपटू आणि प्रेक्षक पोट धरून हसत असतात.

बिहारच्या भोजपुरी भाषेतील अभिनेता रवि किशनच्या आयपीएलमधील क्रिकेट कॉमेंट्रीची चर्चा होत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर दशरथ पाटील यांच्या कॉमेंट्रीचीही चर्चा होताना दिसत आहे.

क्रिकेट कॉमेंट्री करणारे दशरथ पाटील हे नवी मुंबई, पनवेल आणि रायगड भागात खूपच प्रसिद्ध आहे. टपाल खात्यात नोकरी करत असतानाही क्रिकेट कॉमेंट्रीची आवड म्हणून ते आवर्जून क्रिकेट स्पर्धांना जात असत. आताही ते विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये समालोचन करतात. समालोचनाच्या खुमासदार शैलीमुळं आजही ते तितकेच प्रसिद्ध आहेत.

एका मुलाखतीत सांगताना दशरथ पाटील यांनी त्यांच्या कॉमेंट्रीबद्दल सांगितले आहे. दशरथ पाटील म्हणाले, मी क्रिकेट कॉमेंट्री १९८२ पासून सुरुवात केली आहे.त्या काळी क्रिकेट स्पर्धांमध्ये आतासारखे डीजे, माईक नव्हते. भोंग्यावर आम्ही क्रिकेट कॉमेंट्री करायचो. तेव्हा एवढं क्रिकेटला ग्लॅमर नव्हत. तेव्हा मानधनही फारसं नव्हतं. अवघे ५ रुपये दिले जायचे. स्पर्धा संपल्यावर गुलाबाचं फूल देऊन बोळवण करायचे'. आता टेनिस क्रिकट स्पर्धेत फार बदल झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT