SA v ENG World Cup Match Saam tv
Sports

SA vs ENG World Cup Match: दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी उडवली इंग्लिश फलांदाजांची दाणादाण; इंग्लंडचा डाव १७० धावांवर गुंडाळला

SA v ENG World Cup Match:दक्षिण आफ्रिकेने दिलेलं ४०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १७० गारद झाला.

Vishal Gangurde

England vs South Africa World Cup Match:

विश्वचषकात आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंडचा जबरदस्त सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर तब्बल २२९ धावांनी विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं ४०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १७० गारद झाला. यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने २२९ धावांच्या फरकाने इंग्लंडवर मोठा विजय मिळवला. (Latest Marathi News)

इंग्लंडने फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ७ गडी गमावून ३९९ धावांचा डोंगर उभारला.

दक्षिण आफ्रिकेसाठी हेनरिक क्लासेनने सर्वाधिक १०९ धावा कुटल्या. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाऊस पाडला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ४०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झालेली दिसून आली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही इंग्लंड संघावर दबाव निर्माण केला. इंग्लंडचे ६ षटकतच ३ गडी तंबूत परतले. जॉनी बेयरस्टो, एनगिडी, जो रुट हे तिन्ही खेळाडू स्वस्तात बाद झाले. त्यानंतर मार्को यानसेनने इंग्लंडला दोन धक्के दिले.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लिश फलंदाजांची कंबर मोडली. इंग्लंडचा कर्णधार बटलर देखील स्वस्तात माघारी परतला. बटलरनंतर हॅरी देखील लवकर बाद झाला. त्यानंतर इतर फलंदाजही लवकर बाद झाले. तर शेवटचा फलंदाज रीस टॉपली दुखापतग्रस्त झाल्याने मैदानावर उतरला नाही. यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघाने इंग्लंड संघावर २२९ धावांनी सामना जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

SCROLL FOR NEXT