England cricket team squad announced for icc t20 world cup 2024 jos buttler named as captain jofra archer made comeback amd2000 twitter
Sports

England T20 World Cup Squad: टी-२० वर्ल्डकपसाठी इंग्लंडचा संघ जाहीर! जोस बटलरकडे नेतृत्व तर घातक गोलंदाजाचं कमॅबक

ICC T20 World Cup 2024: आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाची जबाबदारी जोस बटलरकडे सोपवण्यात आली आहे.

Ankush Dhavre

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्याची शेवटची तारीख १ मे आहे.नुकताच इंग्लंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. गेल्या वर्षभरापासून संघाबाहेर राहिलेल्या जोफ्रा आर्चरला इंग्लंड संघात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे इंग्लंडची ताकद डबल झाली आहे.

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला येत्या १ जूनपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील काही सामने वेस्टइंडीजमध्ये तर काही सामने अमेरिकेत पार पडणार आहे. जोफ्रा आर्चरला वेस्टइंडीजमध्ये खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. ही इंग्लंडसाठी सकारात्मक बाब आहे. या संघाची जबाबदारी जोस बटलरकडे सोपवण्यात आली आहे. तर फलंदाज म्हणून विल जॅक्स, फिल सॉल्ट आणि जॉनी बेअरस्टोसारख्या विस्फोटक फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. यासह सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टन, हॅरी ब्रुकसारख्या खतरनाक अष्टपैलू खेळाडूंना देखील या संघात स्थान देण्यात आलं आहे.

तर गोलंदाज म्हणून जोफ्रा आर्चर, मार्क वुड, आदील राशिद, टॉम हार्टले आणि बेन डकेट या गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आलं आहे. या स्पर्धेला येत्या १ जूनपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंडचा पहिला सामना ४ जून रोजी स्कॉटलंडविरुद्ध रंगणार आहे. इंग्लंडचा संघ ब गटात असून इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंड, ओमान आणि नामिबिया संघाचा सामना करताना दिसून येणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा आहे इंग्लंडचा संघ..

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले,लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टॉपली, मार्क वुड, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील विविध भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच

Ladki Bahin Yojana: १ लाख ४ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद; मिळणार नाही १५०० रुपये; यादीत तुमचं नाव आहे का?

independence day 2025 : 'मांस विक्रीचे फतवे नंपुसक करायचे'; मांसाहार बंदीवरून महायुतीत मतभेद,VIDEO

Thursday Horoscope : तुमचा साधेभोळेपणा इतरांना भावणार; ५ राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होणार, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

Dhananjay Munde : मुंबईत कोट्यवधींचं घर; मुंडे मात्र 'सातपुडा'वर, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT