England Test Cricket saam tv
Sports

टेस्ट क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या 'या' दिग्गज खेळाडूने रचला इतिहास

इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये लॉर्ड्सच्या मैदानात झालेल्या रंगतदार लढतीत इंग्लंडचा संघ विजयी झाला, पण...

नरेश शेंडे

नवी दिल्ली : इंग्लंड आणि न्युझीलंड मध्ये लॉर्ड्सच्या मैदानात टेस्ट क्रिकेटचा (Test Cricket) सामना सुरु असताना एका नव्या विक्रमाची इतिहासात नोदं झाली. इंग्लंड टेस्ट टीमचा माजी कर्णधार जो रुटने (Joe Root) चकमदार कामगिरी करत टेस्ट क्रिकेट मध्ये तब्बल १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे रुट हा दहा हजार धावांचा विक्रम करणारा जगातील १४ वा आणि इंग्लंडचा दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अॅलेस्टर कुकने (Alastair Cook) टेस्ट क्रिकेट मध्ये दहा हजार धावा केल्या आहेत.

इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये लॉर्ड्सच्या मैदानात झालेल्या रंगतदार लढतीत इंग्लंडचा संघ विजयी झाला. पण या सामन्यात जो रुटने १० हजार धावा पूर्ण केल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. जो रुटने कर्णधार पद सोडल्यानंतर जो रुटचा हा पहिलाच सामना होता. दरम्यान, इंग्लंडचा संघ आता बेन स्टोकच्या नेतृत्वात खेळत आहे. ९० च्या दशकात जन्माला आलेल्या जो रुट आणि अॅलेस्टर कुक या दोघांनीही ३१ वर्षांमध्ये टेस्ट क्रिकेट मध्ये दहा हजार धावा करण्याची अप्रतिम कामगिरी केली आहे.

जो रूट टेस्ट रेकॉर्ड : (Joe Root Test Record)

• 113 टेस्ट, 10015 रन, 49.57 सरासरी

• 26 शतक, 53 अर्धशतक, 254 हायेस्ट स्कोर

इंग्लंडसाठी १० हजारांहून अधिक धावा

• अॅलिस्टर कुक - 12472

• जो रूट - 10015

टेस्ट क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम (Most Runs in Test Cricket) 

सचिन तेंडुलकर - 15921

रिकी पॉंटिंग - 13378

 जॅक्स कॅलिस - 13289

राहुल द्रविड - 13288

अॅलिस्टर कुक - 12472

कुमार संगकारा - 12400

 ब्रायन लारा- 11953

शिवनारायण चंद्रपॉल- 11867

महेला जयवर्धने - 11814

अॅलन बॉर्डर - 11174

स्टीव्ह वॉ- 10927

सुनील गावस्कर- 10122

युनूस खान- 10099

जो रूट- 10015

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT