Sports

ENG vs AFG Highlights : रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानने उडवला इंग्लंडचा धुव्वा; जो रुटची एकाकी झुंज, इंग्रज चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर

ENG vs AFG Highlights Update : रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे. जो रुटची झुंज एकाकी ठरली. तर इंग्लंडचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर गेला आहे.

Vishal Gangurde

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आठवा सामना अफगाणिस्तान आणि इंग्लंडमध्ये झाला. अफगाणिस्तानचा संघ नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्यासाठी उतरला. अफगाणिस्तानने सात गडी गमावून ३२५ धावा कुटल्या. अफगाणिस्तानने उभारलेला धावांचा डोंगर पार करताना इंग्लंडचे सर्व खेळाडू ३१७ धावांवर गारद झाले. अफगाणिस्तानचा संघ ८ धावांनी जिंकला.

अफगाणिस्तानच्या संघाने ५० षटकात सात गडी गमावून ३२५ धावा केल्या. अफगाणिस्तानसाठी इब्राहिम झद्रानने १७७ धावा केल्या. झद्रानच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्ताने इंग्लंडसमोर धावांचं डोंगर उभा केला.

अफगाणिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. फिल साल्ट १२ धावा करून बाद झाला. जेमी स्मिथ १३ चेंडूत ९ धावा करून बाद झाला. बेन डकेटने ४५ चेंडूत ३८ धावा केल्या. हॅरी ब्रूकने २१ चेंडूत २५ धावा केल्या. तर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने ४२ चेंडूत ३८ धावा केल्या.

लियामने ८ चेंडूत १० धावा केल्या. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुटने १११ चेंडूत १२० धावा केल्या. जो रुटने शतकी खेळी खेळली. त्यानंतर सर्व फलंदाज बाद होत गेले. इंग्लंडचा संघ ३१७ धावांवर गारद झाला. सामना गमावल्यानंतर इंग्लंडचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर गेला.

अफगाणिस्तानच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली. सलामीवर रहमानुल्लाह गुरबाजने केवळ ६ धावा केल्या. अटलने ४ चेंडूत ४ धावा केल्या. रहमत शाहने ४ धावा केल्या. जोफ्रा आर्चरने सुरुवातीला ३ गडी बाद केले. हशमतुल्लाह शाहिदीने ४० धावांचं योगदान दिलं. अजमतुल्लाहने ३१ चेंडूत ४१ धावांची खेळी खेळली. अजमतुल्लाह उमरजईने ३१ चेंडूत ४१ धावांची खेळी खेळली. इब्राहिम झद्रानने १४६ चेंडूत १७७ धावांची दमदार खेळी खेळली. इब्राहिम शेवटच्या षटकात बाद झाला. मोहम्मद नबीने २४ चेंडूत ४० धावा कुटल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Mumbai E Water Taxi : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! गेटवे ते जेएनपीए ‘ई वॉटर टॅक्सी’ २२ सप्टेंबरपासून धावणार

Mumbai Local: गुड न्यूज! मुंबई लोकलला ‘वंदे मेट्रो’चा लूक, एसी लोकल होणार १८ डब्यांची; कसा आहे रेल्वेचा प्लान?

Navratri 2025: यंदा नवरात्र उत्सव कधीपासून आहे? तारीख अन् मुहूर्त जाणून घ्या

Gold Rate: सणासुदीत सोनं १ तोळ्यामागे २० हजारांनी वाढणार, वाचा तज्ज्ञांनी का वर्तवला अंदाज

SCROLL FOR NEXT