Shubman Gill  Saam Tv
Sports

Shubman Gill : इंग्लंड टीम विरोधात खेळताना भारताचं कुठं चुकलं? कर्णधार शुभमन गिलने स्पष्टच सांगितलं

Shubman Gill : लॉर्ड्स कसोटीत भारताला २२ धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर शुभमन गिलने माध्यमांसमोर कसोटीदरम्यान झालेल्या चुका सांगितल्या.

Alisha Khedekar

लॉर्ड्स येथील ऐतिहासिक मैदानावर झालेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला फक्त २२ धावांनी पराभूत केले. या कसोटीत टीम इंडियाला विजयी होण्यासाठी जसप्रीत बुमराहने घेतलेल्या ५ विकेट्स, केएल राहुल याचे शतक आणि रवींद्र जडेजाचे दोन्ही डावातले अर्धशतक पुरेसे ठरले नाही. टीम इंडियाचा पराभव का झाला? याचा पाठपुरावा केला तर वेगवेगळी कारणे समोर येतील. परंतु भारतीय कर्णधार शुभमन गिलने पराभवानंतर काही चुका सविस्तर मांडल्या आणि पराभवाचे विश्लेषण केले.तसेच विरुद्ध टीमची कामगिरी अधोरेखित केली.

अवघ्या २२ धावांनी निराश झालेल्या शुभमन गिलने सामन्यानंतर पराभवाच्या पार्श्वभूमीर पत्रकार परिषद घेत आपले मत उघडपणे व्यक्त केले. जे या सामन्यात टीम इंडियाच्या पराभवात महत्त्वाचे ठरले. गिल म्हणाला, "आम्ही चौथ्या दिवशी एक तास आणि पाचव्या दिवशी एक तास चांगला खेळलो नाही. टॉप ऑर्डरने अजिबात चांगली कामगिरी केली नाही. टॉप ऑर्डरने किमान ३०-४० धावा जास्त करायला हव्या होत्या. या मालिकेत पहिल्यांदाच टॉप ऑर्डर अपयशी ठरली."

पुढे गिल म्हणाला की, "भारताचा पराभव २२ धावांमुळे झाला. याउलट इंग्लंडने दोन्ही डावात फक्त ३० अतिरिक्त धावा दिल्या. ज्यामध्ये फक्त ३ धावा बायमधून आल्या. आम्ही क्षेत्ररक्षणात सुधारणा केली आहे, तरीही काही अनावश्यक चुकाही केल्या. आम्ही काही चौकार थांबवू शकलो असतो. तरीही लक्ष्य साध्य करण्यासारखे होते." असे म्हटले.

इंग्लंडच्या कामगिरीवर काय म्हणाला शुभमन गिल ?

तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला २२ धावांनी पराभूत केले.भारताचा कर्णधार शुभमन गिलने यावर नाराजी व्यक्त करत विरुद्ध टीमची कामगिरी अधोरेखित केली. गिल म्हणाला की, "खूप अभिमानाची गोष्ट आहे, कसोटी क्रिकेट यापेक्षा जवळचे असू शकत नाही. आज सकाळी आम्हाला खूप आत्मविश्वास होता, बरीच फलंदाजी शिल्लक होती. आम्हाला टॉप ऑर्डरमध्ये काही भागीदारींची आवश्यकता होती पण आम्ही ते करू शकलो नाही. त्यांनी आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT