England vs Afghanistan Saam tv
Sports

ENG vs AFG: दिल्लीत 'अफगाणी' वादळ! इंग्लंडच्या धुलाई करत दिलं मोठं आव्हान

England vs Afghanistan: या सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी दमदार खेळी केली आहे.

Ankush Dhavre

England vs Afghanistan News:

वर्ल्डकप स्पर्धेतील १३ वा सामना इंग्लंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटक अखेर २८४ धावांचा डोंगर उभारला आहे. इंग्लंडला वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील आपला दुसरा विजय मिळवण्यासाठी २८५ धावांची गरज आहे.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. म्हणून इंग्लंडने हा निर्णय घेतला. अफगाणिस्तान संघाकडून डावाची सुरूवात करताना रहमानुल्लाह गुरबाजने ८० धावांची खेळी केली. तर इब्राहीम जदरानने २८ धावा चोपल्या. या दोघांनी शतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. (Latest sports updates)

मध्यक्रमात इब्राहीम अलिखीलने ६६ चेंडूंचा सामना करत ५८ धावांची खेळी केली. तर राशिद खानने २३ धावांचं योगदान दिलं. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुजीब उर रहमानने १६ चेंडूंचा सामना करत २८ धावांची तुफानी खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT