Asia Cup 2023 ICC Twitter
Sports

Asia Cup 2023: आठवेळा आशिया चषक जिंकणाऱ्या टीम इंडियानं श्रीलंकेला किती वेळा केलं चीतपट? जाणून घ्या आकडेवारी

Asia Cup India Vs SL: भारतानं अवघ्या तीन तासात आशिया चषकाचा अंतिम सामना संपवत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Asia Cup 2023 India Beat Sri Lanka :

आशियातील सर्वात मोठ्या स्पर्धेचा अंतिम सामना कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडिअमवर खेळला गेला. या स्टेडिअमवर टीम इंडियानं नवा विक्रम केला. अवघ्या ३ तासात सामना जिंकत भारतानं विजेतेपद आपल्या नावावर केलं. टीम इंडियाचा मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या संघानं नांगी टाकली. अवघ्या ५० धावांवर संपूर्ण संघ बाद झाला. (Latest Sports News)

जवळपास १९ दिवस चाललेल्या स्पर्धेचा शेवटचा १३ वा सामना टीम इंडियानं १० गडी राखत ६.१ षटकात जिंकला. दरम्यान ८ वेळा आशिया चषक आपल्या नावावर करणाऱ्या टीम इंडियानं आशिषा चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला किती वेळा पराभूत केलंय. ही सर्व आकडेवारी जाणून घेऊ...

भारतानं ८ वेळा आशिया चषकाचं विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक विजेतेपद टीम इंडियाकडे आलंय. आशिया चषक स्पर्धेत भारतानं १९८४, १९८८, १९९१, ११९५ , २०१०, २०१६ , २०१८ आणि आता २०२३ मध्ये विजय मिळवलाय.

१९८४ ला UAE मध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भारतानं राऊंड-रॉबिन फॉर्मेटद्वारे विजेतेपद पटकावलं होतं. तर श्रीलंका उपविजेता संघ ठरला होता. १९८८ मध्ये झालेल्या आशिया कप फायनलमध्ये भारताने ढाका येथे श्रीलंकेचा ६ विकेट्सने पराभव केला होता. या सामन्यात ८७ चेंडूत ७६ धाव करणाऱ्या नवज्योत सिद्धूला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.

११९० -९१ मध्ये भारतात आशिया चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावर्षी भारतानं तिसऱ्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलं होतं. यावेळी भारत आणि श्रीलंका पुन्हा आमने-सामने आले होते. हा सामना भारतानं ७ गडी राखत जिंकला होता. १९९५ मध्ये खेळण्यात आलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनं २३१ धावांचं आव्हान भारतासमोर ठेवलं होतं. भारतानं ४१.५ षटकांत ८ गडी राखत हे आव्हान पार केलं. हा सामना शारजाहमध्ये खेळण्यात आला होता.

२०१० मध्ये झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं मोठा विजय मिळवला होता. या सामन्यात दिनेश कार्तिकनं धमाकेदार फलंदाजी केली होती. गौतम गंभीरसह पहिल्या डावाची सुरुवात करताना, कार्तिकने ८४ चेंडूत ६६ धावा केल्या होत्या. तर टीम इंडियानं ५० षटकात ६ बाद २६८ धावा केल्या होत्या. तर भारताकडून गोलंदाजी करताना आशिष नेहराने ४ बळी या सामन्यात घेतले होते.

२०२३ च्या आशिया चषकात भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला अवघ्या ५० धावात खाली बसवलं. या सामन्यात मोहम्मद सिराजनं ६ विकेट्स घेतल्या. टीम इंडियानं ६.१ षटकात १० विकेट्स राखत आशिक चषक आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : धाराशिवमध्ये जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत आपल्या बाप्पाची काढली मिरवणूक

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

SCROLL FOR NEXT