UEFA Euro Cup Finals 2024 England And Spain: Saamtv
Sports

Euro Cup Final: युरो फूटबॉल स्पर्धेचा अंतिम थरार! इंग्लड दुष्काळ संपवणार की स्पेन चौथ्यांदा बाजी मारणार? कुणाचे पारडे जड?

UEFA Euro Cup Finals 2024 England And Spain: रविवारी रात्री इंग्लंड आणि स्पेन यांच्यात UEFA युरोपियन चॅम्पियनशिपचा (युरो कप) अंतिम सामना रंगणार आहे.

Gangappa Pujari

बर्लिन, ता. १४ जुलै २०२४

युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि इंग्लडमध्ये अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्याकडे जगभरातील फुटबॉल प्रेमींचे लक्ष लागले असून इंग्लड ५८ वर्षांचा दुष्काळ संपवणार की स्पेन चौथ्यांदा बाजी मारणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

स्पेन- इंग्लडमध्ये अंतिम थरार!

रविवारी रात्री इंग्लंड आणि स्पेन यांच्यात UEFA युरोपियन चॅम्पियनशिपचा (युरो कप) अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात स्पेनचे विक्रमी चौथे विजेतेपद पटकावण्याकडे लक्ष असेल, तर इंग्लंडचा 58 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याचा प्रयत्न असेल. 1966 च्या विश्वचषक विजेतेपदानंतर इंग्लंडचा संघ पहिला मोठा ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल. स्पेनचा संघ 1964, 2008 आणि 2012 मध्ये चॅम्पियन ठरला आहे.

कुणाचे पारडे जड?

स्पेन आणि जर्मनीने प्रत्येकी तीन युरो जेतेपद पटकावले असून रविवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्पेनचे पारडे जड असेल. या स्पर्धेत स्पेनचा संघ आतापर्यंतचे सर्व सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. गेल्या काही काळापासून संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये युएफा नेशन्स लीगचे विजेतेपद जिंकले होते.

दुसरीकडे, इंग्लंडने युरो 2024 मध्ये नॉकआउट स्टेजमधील तिन्ही सामने जिंकले असून, त्यांनी मागून स्पर्धेत पुनरागमन केले आहे. स्वित्झर्लंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत संघाने 80व्या मिनिटाला बुकायो साकाच्या गोलने बरोबरी साधली आणि त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवला. नेदरलँड्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत बदली खेळाडू ऑली वॅटकिन्सने ९०व्या मिनिटाला विजयी गोल केला.

सहा वर्षांनंतर आमने-सामने!

इंग्लंड आणि स्पेनचे संघ तब्बल सहा वर्षानंतर आमनेसामने येणार आहेत. या दोघांनी 2018 नेशन्स लीगमध्ये डबल-हेडर खेळला, ज्यामध्ये स्पेनने वेम्बली स्टेडियमवर 2-1 असा विजय मिळवला आणि एका महिन्यानंतर सेव्हिला येथे इंग्लंडने 3-2 असा विजय मिळवला. युरो 2024 मधील सहा खेळाडू स्पर्धेत सर्वाधिक तीन गोल करत आहेत आणि त्यापैकी दोन अंतिम फेरीत खेळत आहेत. यामध्ये इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन आणि स्पेनचा डॅनी ओल्मो यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT