ED Raid x
Sports

Team India च्या क्रिकेटपटूंना ED चा दणका! मनी लाँड्रिंग प्रकरणी मालमत्ता जप्त, कोणा-कोणावर कारवाई?

ED Raid : बेटिंग अ‍ॅपच्या जाहिरात प्रकरणात युवराज सिंह, शिखर धवन, सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा यांच्यावर मोठी कारवाई झाली आहे. ईडीद्वारे या क्रिकेटपटूंची मालमत्ता जप्त केली जाणार आहे.

Yash Shirke

  • युवराज सिंह, शिखर धवन, सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता EDने जप्त केली.

  • 1xBet बेटिंग अ‍ॅपच्या जाहिरातीमुळे या क्रिकेटपटूंवर कारवाई झाली आहे.

  • मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीत ईडीने दिग्गज क्रिकेटपटूंना तासोंत चौकशी केली.

Team India च्या माजी स्टार क्रिकेटपटूंच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंग प्लॅटफॉर्म 1xBet ची जाहिरात केल्याप्रकरणी युवराज सिंह, शिखर धवन, सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा हे ईडीच्या रडारवर आहेत. जाहिरात प्रकरणात या क्रिकेटपटूंना लाखो-करोडोंच्या मालमत्तेची जप्ती सहन करावी लागत आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीद्वारे दिग्गज क्रिकेटपटूंची मालमत्ता जप्त केली जाणार आहे.

मागील काही काळापासून ईडी ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंग प्लॅटफॉर्म 1xBet शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे. युवराज सिंह, शिखर धवन, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा यांच्या व्यतिरिक्त सोनू सूद आणि मिमी चक्रवर्ती यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे म्हटले जात आहे. जाहिरातीच्या बदल्यात बेटिंग अ‍ॅपने सर्वांना एंडोर्समेंट फी दिली होती. या फीमधून खरेदी केलेली मालमत्ता 'गुन्ह्यातून मिळालेल्या उत्पन्नाचा' भाग आहे' असे ईडीच्या तपासात समोर आले आहे.

ईडीच्या तपासानुसार, क्रिकेटपटूंनी अ‍ॅपच्या प्रचारातून, जाहिरातीतून कोट्यवधी रुपये कमावले. याचा वापर त्यांनी मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला. काहींना परदेशात या पैशांनी मालमत्ता खरेदी केली आहे. भारतातील मालमत्तेवर जप्ती येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ईडी त्यांच्या परदेशातील मालमत्ता जप्त करण्यासाठी काही कारवाई करेल की नाही हे स्पष्ट नाही. याशिवाय प्रत्येक क्रिकेटपटूने अ‍ॅपच्या जाहिरातीतून मिळालेली एंडोर्समेंट फी वापरून खरेदी केलेल्या मालमत्तेची नेमकी रक्कम किती आहे हे अद्याप अस्पष्ट आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवी दिल्लीतील ईडी मुख्यालयामध्ये चारही क्रिकेटपटूंची एक-एक करुन अनेक तास चौकशी करण्यात आली होती. ईडीने समन्स बजावल्यानंतर ते एकामागून एक चौकशीसाठी हजर झाले होते. क्रिकेटपटूंसह सिनेस्टार सोनू सूद, मिमी चक्रवर्ती आणि अंकुश हाजरा यांचीही मालमत्ता जप्त केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, आज खरेदीचा 'गोल्डन चान्स'; 18K, 22K आणि 24K चे दर किती?

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना कधीच मिळणार नाही ₹२०००; पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Solapur : नवऱ्याने बायकोला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, एकांतात बोलायचे सांगून खोलीत नेलं, नंतर...

Mumbai To Kedarnath Travel: मुंबईहून केदारनाथ कसं जायचं? जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग

SCROLL FOR NEXT