Women’s World Cup 2025 saam tv
Sports

Women’s World Cup 2025: महिला वर्ल्ड कप विजेत्या टीमला टाटा मोटर्सकडून मोठ्ठं गिफ्ट; प्रत्येक खेळाडूला मिळणार नवी Tata Sierra SUV

Women's World Cup champions Tata Sierra SUV: भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल केवळ देशातूनच नव्हे, तर कॉर्पोरेट जगतातूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नुकतंच टीम इंडियाच्या महिलांनी आयसीसी विमेंस वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. फायनलच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताच्या महिलांनी इतिहास रचला. टीमच्या या विजयानंतर भारतीय महिलांवर बक्षिसांचा वर्षाव सुरु आहे. राज्य सरकारकडूनही मुलींना बक्षिसं जाहीर करण्यात आली आहेत. अशातच आता देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सनेही खेळाडूंना एक खास भेट देण्याची घोषणा केली आहे.

प्रत्येक खेळाडूला मिळणार Tata Sierra SUV

टाटा मोर्टर्स यांनी गुरुवारच्या दिवशी माहिती दिली की, भारतीय महिला क्रिकेट टीममधील प्रत्येक खेळाडूला नवी Tata Sierra SUV भेट म्हणून दिली जाणार आहे. कंपनीने स्पष्ट केलंय की, ही भेट खेळाडूंच्या मेहनत, धैर्य आणि देशासाठी त्यांनी केलेल्या योगदानाची दखल घेत दिली जातेय.

कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटलंय की, “टाटा मोटर्स टीमच्या समर्पण, जिद्द आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करत प्रत्येक खेळाडूला Tata Sierra चा टॉप मॉडेल भेट देणार आहे.”

टीम इंडियाच्या महिलांचा ऐतिहासिक विजय

2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 52 रन्सने पराभूत केलं. या पराभवानंतर महिलांनी पहिल्यांदा वर्ल्डकप आपल्या नावावर केला. या विजयात शफाली वर्मा हिच्या 87 रन्सची शानदार खेळी आणि दीप्ती शर्माच्या 5 विकेट्सचा मोलाचा वाटा होता. या विजयासह हरमनप्रीत कौर कपिल देव (1983) आणि महेंद्रसिंह धोनी (2011) यांच्यानंतर 50-ओव्हर वर्ल्डकप जिंकणारी तिसरी भारतीय कर्णधार ठरली आहे.

टाटा मोटर्सचे एमडी आणि सीईओ शैलेश चंद्र यांनी म्हटलंय की, “भारतीय महिला क्रिकेट टीमने आपल्या उत्कृष्ट खेळाने संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असा क्षण अनुभवण्यास दिला आहे. हा विजय मेहनत, आत्मविश्वास आणि जिद्दीचे प्रतीक आहे.”

Tata Sierra ही भारतीय ऑटोमोबाईल इतिहासातील एक प्रतिष्ठित SUV आहे. पहिल्यांदा 1991 मध्ये लॉन्च झालेली ही गाडी त्या काळात अत्यंत लोकप्रिय ठरली होती. आता ही SUV 25 नोव्हेंबर 2025 रोजी नव्या 5-डोअर मॉडर्न व्हर्जनमध्ये पुन्हा लॉन्च केली जाणार आहे. टाटा मोटर्सने स्पष्ट केलंय की, खेळाडूंना याचं टॉप-एंड मॉडेल भेट दिलं जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

SCROLL FOR NEXT