dutee chand  saam tv
Sports

Dutee Chand: 'तुमच्या चुका सर्वांना दिसतात...'४ वर्षांच्या बंदीनंतर द्युती चंद सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Dutee Chand Instagram Post: हा निर्णय येताच तिने निर्णयाविरूद्ध अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

Dutee Chand Banned For 4 Years:

भारताला आशियाई स्पर्धेत २ वेळेस रौप्यपदक जिंकून देणारी द्युती चंद मोठ्या अडचणीत अडकली आहे. डोपिंग प्रकरणात अडकल्याने तिच्यावर ४ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीकडून तिच्यावर बंदी घातली गेली आहे. हा निर्णय येताच तिने निर्णयाविरूद्ध अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.

तिने अपील केली असली तरीदेखील जोपर्यंत तिची निर्दोष मुक्तता होत नाही तोपर्यंत तिच्यावर बंदी कायम राहणार आहे. ही माहिती समोर येताच द्युतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतेय.

द्युतीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती BMW कारसोबत उभी असल्याचे दिसून येत आहे. तर ओडिया भाषेत तिने तुमचे अश्रू कोणीही लक्षात घेणार नाही. तुमचे दु:ख कोणालाही जाणवणार नाही, पण तुमच्या चुका सर्वांना दिसतात.' असे लिहिले आहे. (Latest sports updates)

NADA ने ५ आणि २६ डिसेंबर रोजी द्युतीचे सँपल घेतले होते. या दोन्ही सँम्पलमध्ये 'इतर ऍनाबॉलिक एजंट/एसएआरएमएस' असे प्रतिबंधीत पदार्थ सापडले आहेत. त्यामुळे तिच्यावर ४ वर्षांसाठी बंदी घातली गेली होती. या बंदीचा कालावधी ३ जानेवारी २०२३ पासून सुरू झाला आहे. त्यामुळे बंदी लावल्यानंतर तिने जे काही मेडल्स मिळवले आहेत किंवा विक्रम केले आहेत ते परत घेण्यात येतील.

२०२१ मध्ये तिच्या पोटाच्या खालच्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झाले होते. यादरम्यान तिला प्रचंड वेदना झाल्या होत्या. माध्यमातील वृ्त्तानूसार तिच्या वेदना कमी झाल्यानंतर कुठलीही औषधे घेतली नाही तसेच कुठलीही तपासणी केलेली नाही. द्युतीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, ज्यावेळी तिने औषधे घेतली होती,त्यात प्रतिबंधीत पदार्थांचाही समावेश आहे हे तिला माहित नव्हतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT