dream sports football tournament saam tv
Sports

Football News: ड्रीम स्पोर्ट्स अंडर 17 राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेला 1 जूनपासून प्रारंभ

Dream Sports Under 17 Football Tournament: ड्रीम स्पोर्ट्स अंडर 17 राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेला 1 जूनपासून प्रारंभ होणार आहे.

Ankush Dhavre

ड्रीम स्पोर्ट्स १७ वर्षांखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेस १ जूनपासून प्रारंभ होणार असून देशभरातील अव्वल ८ संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. या स्पर्धेतील अंतिम सामना ७ जून रोजी मुंबई येथील कूपरेज फुटबॉल ग्राऊंडवर रंगणार आहे.

भारतातील क्रीडा तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ड्रीम स्पोर्ट्स अंतर्गत असलेल्या ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने १७ वर्षांखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेच्या मान्यतेखाली १ एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान भारतातील प्रमुख सहा फुटबॉल हब असलेल्या ठिकाणी या स्पर्धेच्या विभागीय फेऱ्या पार पडल्या.

यामध्ये देशभरातून ३७ संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. आयएसएल व आय-लीगमधील एआयएफएफ मान्यताप्रत अकादमींचा यात समावेश होता. या लीगमधील विजेते संघ(शिलॉंग व गोवा येथील उपविजेते संघ) यांनी मुंबई येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

सहभागी आठ संघांमध्ये ईस्ट बंगाल एफसी, लाह बेट एफसी, राउंडग्लास पंजाब एफसी, चेन्नईन एफसी, मुंबई सिटी एफसी, फुटबॉल ४ चेंज, एफसी गोवा, डेम्पो एससी यांचा समावेश आहे.

युवा खेळाडूंसाठी सुव्यवस्थित, उच्च दर्जाच्या स्पर्धा उपलब्ध करून देणे हा ड्रीम स्पोर्ट्स अजिंक्यपद स्पर्धा भरविण्यामागील उद्देश आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंच्या विकासासाठी नियमित स्पर्धात्मक सामन्यांचा सराव महत्त्वाचा ठरणार आहे. या स्पर्धेबद्दल सामाजिक स्तरावर मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि एआयएफएफकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियामुळे, ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशनने येत्या काही वर्षात याचा आणखी विस्तार करण्याचे आणि आगामी काळात अधिक वैयक्तिक खेळ आणि वयोगटांना एकत्र आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

या सामन्यांचे थेट प्रक्षेपण फॅनकोड मोबाईल ऍप, टीव्ही ऍप, अमेझॉन फायर टीव्ही स्टिक,एअरटेल एक्स्ट्रीम, जिओ एसटीबी, सॅमसंग टीव्ही, ओटीटी प्ले, जिओ टीव्ही, जिओ टीव्ही प्लस, प्राईम व्हिडीओ चॅनल अथवा https://www.fancode.com या संकेत स्थळावर देखील पाहता येणार आहे. देशांतर्गत फुटबॉलसाठी फॅनकोड हे प्रसिद्ध असून याआधी त्यांनी हिरो सुपर कप, आय-लीग, गोवा प्रोफेशनल लीग यांसारख्या स्पर्धांचे देखील प्रक्षेपण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT