रविवारी रात्री रोमांचक झालेल्या मुंबई विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात अक्षर पटेलच्या टीमला सिझनमधील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात शेवटच्या क्षणी १२ रन्सने मुंबईने विजय नोंदवला. पहिल्या पराभवाचा धक्का पचवत असतानाच दिल्लीचा टीमचा कर्णधार अक्षर पटेलला अजून एक धक्का बसला आहे. सामन्यानंतर अक्षर पटेलवर BCCI कडून कारवाई करण्यात आली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २०५ रन्स केले. यानंतर करुण नायरने दिल्लीसाठी ८९ रन्सची खेळी खेळली. अशा परिस्थितीत दिल्ली विजयाकडे वाटचाल करत असल्याचं दिसत होतं. १९ व्या ओव्हरमध्ये दिल्लीचे तीन फलंदाज रनआऊट झाले आणि १२ रन्सने त्यांना सामना गमवावा लागला. अशातच दिल्ली कॅपिटल्सला दुहेरी धक्का बसला आहे. सामना गमावला आणि दुसरे म्हणजे कर्णधार अक्षर पटेलला स्लो ओव्हर्ससाठी दंड ठोठावण्यात आला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलला स्लो ओव्हर रेटसाठी १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, जर एखाद्या टीमने सिझनमध्ये पहिल्यांदाच स्लो ओव्हर रेटचे उल्लंघन केलं तर टीमच्या कर्णधाराला १२ लाख रुपयांचा दंड आकारला जातो. यंदाच्या या सिझनमधील अक्षरची स्लो ओव्हर रेटबाबत ही पहिलीच चूक आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स टीमने पॉइंट्स टेबलमधील नंबर-१ चं स्थान गमावलंय. आता गुजरात टायटन्सची टीम पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. दिल्ली टीमने आतापर्यंत एकूण ५ सामने खेळले असून त्यापैकी चार जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे.
करुण नायरची ८९ रन्सची खेळी विजय मिळवून देऊ शकली नाही. मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी चांगली कामगिरी केली. तिलकने ३३ चेंडूत ५९ रन्स केले आणि त्यांच्यामुळे टीम २०५ रन्स करण्यात यशस्वी झाला. यानंतर, दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खूपच खराब झाली. दिल्लीकडून करुण नायरने ४० चेंडूत ८९ रन्स केले. पण टीमला तो विजय मिळवून देऊ शकला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.