Yuzvendra Chahal Saam TV
Sports

Video: पत्नी धनश्री हसली, लाजली अन् नाचली सारं काही युझीसाठी, कारणही खासच

युझवेंद्र चहलने मोक्याच्या वेळी विकेट घेवून धावसंख्याही रोखली होती.

वृत्तसंस्था

मुंबई: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) लेगस्पिनर युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चहलच्या फिरकीसमोर त्याच्या जुन्या फ्रँचायझीचे फलंदाजांनी नांग्या टाकल्या होत्या. युझवेंद्र चहलने मोक्याच्या वेळी विकेट घेवून धावसंख्याही रोखली होती. चहलच्या कामगिरीनं त्याची पत्नी धनश्री वर्माही खूष झाली आणि तिनं मैदानातंच मनापासून आनंद व्यक्त केला.

चहलने चार षटकात अवघ्या 15 धावा देत दोन बळी घेतले. आपल्या पहिल्याच षटकात चहलने बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि पुढच्याच षटकात डेव्हिड विलीला बोल्ड केले. यासह फिरकी गोलंदाजाने विराट कोहलीला धावबाद करण्यातही आपली महत्त्वाची भूमिका बजावली. (Dhanashree Verma Dance)

चहलने डेव्हिड विलीला बोल्ड करताच स्टँडमध्ये उपस्थित असलेली त्याची पत्नी धनश्री वर्माने आनंद (Dhanashree Verma Dance) व्य्क्त केली. तिच्या या भावनिक प्रतिक्रियेने सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. चहलची गोलंदाजी राजस्थान संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. राजस्थानने बंगळुरूसमोर 170 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद यांच्या फलंदाजीमुळे रॉयल चॅलेंजर्सने हातातून गेलेला सामना जिंकता आला.

राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये सलग दोन सामने जिंकले असून या मोसमात त्यांना प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राजस्थानचे गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि रविचंद्रन अश्विन चांगलेच महागात पडले. कृष्णाने चार षटकांत 40 आणि अश्विनने 39 धावा दिल्या. या दोन्ही गोलंदाजांना एकही बळी मिळवता आला नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये ईद-ए-मिलाद निमित्त भव्य मिरवणूक

Ticket Collector: '...तर मी रोज प्रवास करेन', ट्रेनमधील हँडसम TC ला पाहून तरुणी पडली प्रेमात, VIDEO

Aadhaar Card: नागरिकांना सुप्रीम कोर्टाचा 'आधार'; नागरिकत्वाठी आधार कार्ड ग्राह्य धरा, निवडणूक आयोगाला आदेश

Nagpur Crime : एटीएममधून पैसे चोरीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने अडकला, चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Ananya Panday: अनन्या पांडेचा मीडियासमोर फोटो काढण्यास नकार, कारणही सांगितलं, म्हणाली- मी ५ वाजता उठले...

SCROLL FOR NEXT