CSK vs SRH Match Updates Saam TV
क्रीडा

CSK vs SRH Highlight: कॉनवे-ऋतुराजने हैदराबादला धुतलं; एकतर्फी सामन्यात चेन्नईचा ७ विकेट्सने विजय

CSK vs SRH Match Updates: चेन्नई सुपरकिंग्जने सनरायझर्स हैदराबादचा ७ गड्यांनी पराभव केला.

Satish Daud

CSK vs SRH Match Updates: डेवॉन कॉनवेची ५७ चेंडूत धावांची ७७ नाबाद खेळी, त्याला ऋतुराज गायकवाडने दिलेली ३५ धावांची साथ आणि रविंद्र जडेजाने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने सनरायझर्स हैदराबादचा ७ गड्यांनी पराभव केला. चेन्नईचा यंदाच्या हंगामातील हा चौथा विजय आहे. या विजयासासह त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादने चेन्नईसमोर निर्धारित २० षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावांचे आव्हान ठेवले. हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक ३४ धावा केल्या. राहुल त्रिपाठी २१ तर हॅरी ब्रुकने १८ धावांची खेळी केली.

अभिषेक शर्माचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला ३० धावसंख्येचा पल्ला पार करत आला नाही. चेन्नईच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. रविंद्र जाडेजाने ३ विकेट घेत हैदराबादचे कंबरडे मोडले. चेन्नईच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच अचूक टप्प्यावर मारा केला. आकाश सिंह, तुषार देशपांडे आणि ज्युनिअर मलिंगा यांनी भेदक मारा केला.

तर मोईन अली, रविंद्र जाडेजा आणि महिश तिक्ष्णा यांनी फिरकीच्या जाळ्यात हैदराबादच्या फलंदाजांना फसवले. जडेजा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात २२ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. तर आकाश सिंह, महिश तिक्ष्णा, पथिराणा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

दरम्यान, हैदराबादकडून मिळालेल्या १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने दमदार सुरुवात केली. सलामीवर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवेने पावरप्लेमध्ये हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी पहिल्या विकेट्साठी ८७ धावांची भागिदारी केली.

ऋतुराज गायकवाड आज लयीत दिसला. तो अर्धशतक ठोकून संघाला विजय मिळवून देईल, असं वाटत असतानाच धावबाद झाला. ऋतुराजने ३० चेंडूत ३५ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडूला मयांक मार्कंडेने झटपट माघारी पाठवले. रहाणे आणि रायडूने प्रत्येकी ९ धावा केल्या.

एकापाठोपाठ एक तीन विकेट्स गमावल्यानंतरही डेवॉन कॉनवेने चेन्नई संघावर दडपण येऊ दिले नाही, त्याने हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई करत चेन्नईला विजय मिळवून दिला. कॉनवे ७७ धावा काढून नाबाद राहिला. हैदराबादकडून मार्कंडे वगळता एकाही फलंदाजाला विकेट्स काढता आल्या नाहीत. अखेर चेन्नईने १३५ धावांचे आव्हान १८.३ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची भावनेला हात घालणारी प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT