Rajat Patidar on team defeat saam tv
Sports

RCB vs GT: आम्ही प्रयत्न केला पण...; स्वतः चूक करूनही रजत पाटीदारने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

Rajat Patidar on team defeat: इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर बंगळुरूवर मोठा विजय मिळवत आठ विकेट्स राखून सामना जिंकला. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने संघाच्या सुरुवातीच्या फलंदाजीतील अपयश मान्य करत लवकरच अनेक विकेट्स गमावल्याची कबुली दिली.

Surabhi Jayashree Jagdish

इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्सने आठ विकेट्स राखून रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा दारूण पराभव केला. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने आपल्या टीमने सुरुवातीलाच अधिक विकेट गमावल्याची कबुली दिलीये. आरसीबीच्या टीमने एका वेळी ४२ रन्समध्ये चार विकेट्स गमावले होते. पण लिव्हिंगस्टोनने ४० बॉल्समध्ये पाच सिक्स आणि एका फोरसह ५४ रन्स केले. दरम्यान या पराभवानंतर रजत पाटीदार निराश होता.

190 पर्यंतही पोहोचू शकली नाही आरसीबी

२० ओव्हरमध्ये आरसीबीची टीम अवघे १६९ रन्स करू शकली. दरम्यान सामन्यानंतर रजत पाटीदारने सांगितलं की, आपल्या टीमचं लक्ष १९० च्या आसपास होतं. २०० नव्हे, तर १९० धावांच्या आसपास धावसंख्या नेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. या सामन्यात सुरुवातीच्या विकेट्सचा आम्हाला फटका बसला. पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स गमावल्याने त्याचा फरक अधिक पडला. आम्ही इतक्या विकेट्स गमवायला नको होत्या.

पाटीदार पुढे म्हणाला की, दुसऱ्या डावात खेळपट्टी फलंदाजीसाठी थोडी चांगली झाली होती. पण आमच्या गोलंदाजांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली ती देखील अप्रतिम होती. त्यांनी खूप मेहनत घेतली आणि ते सोपे नव्हतं.

पाटीदारने जितेश, लिव्हिंगस्टोन आणि टिम डेव्हीड यांचंही कौतुक केलं. तो म्हणाला, 'तीन विकेट पडल्यानंतर जितेश, लियाम आणि टिमने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते वाखणण्याजोगं होतं. या सामन्यातून त्यांची सकारात्मकता दिसून आली. आम्हाला आमच्या फलंदाजी युनिटबद्दल खूप विश्वास आहे.

बटलरने गुजरातला मिळवून दिला विजय

१७० च्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी झटपट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी गिल १४ रन्स करून बाद झाला. पण सुदर्शनने आपली लय कायम ठेवली. 13व्या ओव्हरमध्ये तो जोश हेझलवूडच्या बॉलवर बाद झाला, पण तोपर्यंत बटलर दुसऱ्या टोकाकडून फटकेबाजी करत होता. बटलर आणि शेरफेन रदरफोर्ड यांनी मिळून ६३ रन्सची खेळी केली. बटलरने ३९ रन्समध्ये नाबाद ७३ रन्सची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT