Lata Mangeshkar Saam TV
Sports

Lata Mangeshkar: दीदींच्या जाण्याने क्रिकेट विश्वात शोककळा ; दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

सर्व संगीत आणि आठवणींसाठी धन्यवाद. कुटुंब आणि प्रियजनांना माझ्या मनापासून संवेदना.

वृत्तसंस्था

मुंबई: भारतरत्न आणि भारताच्या सूर सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज मुंबईमध्ये निधन झालं आहे. वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनामुळे संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. आज रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. रातकीय, सामाजीक, सांस्कृतीक, संगीत क्षेत्रातून दु:ख व्यक्त केले जात आहे.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) श्रद्धांजली वाहिली आहे. लताजींच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झाले. त्यांच्या सुमधुर गाण्यांनी जगभरातील लाखो लोकांना मंत्रमुग्ध केले. सर्व संगीत आणि आठवणींसाठी धन्यवाद. कुटुंब आणि प्रियजनांना माझ्या मनापासून संवेदना. असे ट्विट करत कोहलीने श्रद्धांजली वाहिली आहे.

'भारतरत्न लता मंगेशकर दीदींच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. त्यांचा आवाज आणि सूर अजरामर असतील. त्यांचे कुटुंब, मित्र आणि जगभरातील लाखो चाहत्यांसाठी माझ्या संवेदना. असे ट्विट करत भारताचा माजी फंलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज, गौतम गंभीर, व्यंकटेश प्रसाद यांनी आदरांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT