Mumbai vs Delhi, Ranji Trophy Update
Mumbai vs Delhi, Ranji Trophy Update @BCCIdomestic
क्रीडा | IPL

Mumbai vs Delhi Ranji Trophy : सरफराज खानची शतकी खेळी व्यर्थ; दिल्लीचा ४३ वर्षांनी मुंबईवर विजय

Nandkumar Joshi

Mumbai vs Delhi, Ranji Trophy Update : दिल्ली क्रिकेट संघानं शुक्रवारी इतिहास रचलाय. दिल्लीनं रणजी करंडक स्पर्धेत ४१ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला ८ विकेटने नमवलं. दिल्लीनं रणजी करंडक स्पर्धेत मुंबईला विरोधात ४३ वर्षांनंतर पहिल्यांदाच मात दिली आहे.

मुंबईने या सामन्याच्या पहिल्या डावात २९३ धावा केल्या होत्या. त्यानंतर दिल्लीने आपल्या पहिल्या डावात ३६९ धावा करून ७६ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दिल्लीच्या संघानं दुसऱ्या डावात मुंबईला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. अवघ्या १७० धावांवर मुंबईला गुंडाळलं. दिल्लीला विजयासाठी ९५ धावांची आवश्यकता होती. अवघ्या दोन विकेट गमावून दिल्लीनं विजय मिळवला. (Sports News)

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या ऋतिक शौकिन यानं नाबाद ३६ धावा केल्या. सलामीवीर वैभव शर्मा यानं ३६ धावा केल्या. अनुज रावत यानं १४ धावा, तर नितीश राणा हा ६ धावा करून नाबाद राहिला.

मुंबईला दिल्लीनं रोखलं

सामन्याच्या अखेरच्या दिवसाची सुरुवात मुंबईनं केली. तनुष कोटियान आणि रॉयस्टन डीएस यानं संघाचा डाव ९ बाद १६८ धावांवरून पुढे सुरू केला. टीमच्या खात्यात एक धाव जोडली असताना शौकिन यानं रॉयस्टनला बाद केलं आणि मुंबईचा डाव संपुष्टात आणला. (Cricket News)

त्यानंतर मैदानात उतरलेल्या दिल्ली संघाला माफक लक्ष्य गाठण्यासाठी खूप कष्ट करावे लागले नाहीत. अनुज रावतला मोहित अवस्थी याने संघाच्या २२ धावा असताना बाद केलं. दिल्लीला धक्का देण्याचा प्रयत्न केला. पण वैभव आणि शौकिन याने दिल्लीचा डाव सावरला आणि विजयासमीप नेलं.

संघाच्या धावफलकावर ९१ धावा असताना वैभव बाद झाला. त्याला शम्स मुलानी यानं बाद केलं. वैभवने ४९ चेंडूंचा सामना करताना चार चौकार आणि एक षटकार लगावला. शौकिननं ३९ चेंडूंचा सामना करताना पाच चौकार आणि एक षटकार मारला.

सरफराजची शतकी खेळी व्यर्थ

या सामन्यात मुंबईचा फलंदाज सरफराज खान यानं शतक झळकावलं होतं. पण त्याची ही खेळी व्यर्थ गेली. संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सरफराजनं पहिल्या डावात हे शतक झळकावलं होतं. त्यानं १५५ चेंडूंत १६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीनं १२५ धावा केल्या होत्या. पृथ्वी शॉ यानं ४० धावा, तर मुलानीनं ३९ धावा केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT