Manasvi Choudhary
ब्रेड बेसन टोस्ट हा अत्यंत झटपट, चविष्ट होणारा नाश्त्याचा पदार्थ आहे.
अवघ्या १० मिनिटांत तुम्ही ब्रेड बेसन टोस्ट बनवू शकता. ब्रेड बेसन टोस्ट ही घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
ब्रेड, बेसन, हळद, मसाला, ओवा , मीठ , तेल हे साहित्य एकत्र करा.
ब्रेड बेसन टोस्ट बनवण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन पीठ घ्या. नंतर त्यात हळद, लाल मसाला, मीठ आणि ओवा मिक्स करा.
मिश्रणात थोडे पाणी मिक्स करा. मिश्रण जास्त घट्ट आणि जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
गॅसवर पॅनवर गरम तेलामध्ये ब्रेडचे स्लाईस तयार मिश्रणात दोन्ही बाजूंनी बुडवून सोडा.
ब्रेड दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. कडेने थोडे तेल सोडा जेणेकरून बेसन कच्चे राहणार नाही.
अशाप्रकारे गरमागरम ब्रेड बेसन टोस्ट टोमॅटो केचअप किंवा हिरव्या पुदिना चटणीसोबत सर्व्ह करा.