Manasvi Choudhary
शनिवार हा शनीदेवाला समर्पित आहे. शनिवारी तुम्ही घरीच काही सोपे उपाय केल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होतील.
कोणाच्या कुंडलीत शनीची साडेसाती असेल तर तुम्ही खालील ५ उपाय करणे अत्यंत महत्वाचे आहे.
शनिवारी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
शनि मंदिरात जाऊन शनिदेवांना मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करावेत. मात्र, शनिदेवांच्या डोळ्यात डोळे घालून दर्शन घेऊ नये, चरणांकडे पाहून प्रार्थना करावी.
शनिदेवाला हनुमानाचे भक्त प्रिय असतात. ज्यांच्यावर हनुमानजींची कृपा असते, त्यांना शनीचा त्रास होत नाही. त्यामुळे शनिवारी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड वाचणे अत्यंत शुभ मानले जाते.
शनि हा कर्माचा देवता आहे. शनिवारी काळे कपडे, काळे तीळ, छत्री, जोडे किंवा अन्नाचे दान गरिबांना केल्याने शनीचा दोष कमी होतो.
हिंदू धर्मात कावळ्याला शनीचे वाहन मानले जाते. शनिवारी कावळ्यांना भाकरी किंवा अन्न दिल्याने पितृदोष आणि शनीदोषातून मुक्ती मिळते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.