IND vs SA Final Rishabh Pant alzeera
Sports

Rishabh Pant: रिषभ पंतचा दिल्लीला रामराम? या 2 संघांकडून कॅप्टन्सीची ऑफर

Rishabh Pant, IPL 2025: भारताचा आक्रमक फलंदाज रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघाची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Ankush Dhavre

Rishabh Pant Release: आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. सर्व संघांना येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार आहे. त्यामुळे सर्व संघांनी प्लानिंग करायला सुरुवात केली आहे.

आगामी हंगामात काही फ्रेंचायझी आपल्या संघातील स्टार खेळाडूंना रिलीझ करण्याच्या विचारात आहे. ज्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा देखील समावेश आहे. दिल्लीचा संघ त्याला रिलीझ करु शकते.

काही दिवसांपूर्वी रिषभ पंत दिल्लीकडूनच खेळणार असल्याची जोरदार चर्चा होती. कारण दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदाल यांनी घोषणा केली होती की, रिषभ पंत दिल्लीकडूनच खेळणार.

मात्र आता दिल्ली कॅपिटल्स रिषभ पंतला रिलाज करणार असल्याची चर्चा सुरु आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्स संघाच्या मालकी हक्कांमध्ये बदल झाल्यामुळे रिषभ पंतला रिटेन करायचं की रिलीझ करायचं? याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. इथून पुढे २ वर्ष या संघाचे मालकी हक्क जीएमआर ग्रुपकडे असणार आहे.

पंतला संघात घेण्यासाठी या संघांमध्ये चुरशीची लढत

दिल्ली कॅपिटल्स संघ रिषभ पंतला रिलीज करणार असल्याची माहिती मिळताच, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सने त्याला संघात घेण्यसाठी कंबर कसली आहे. गेल्या हंगामात शिखर धवन हा पंजाबचा कर्णधार होता.

मात्र आता त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे पंजाबला कर्णधार आणि आक्रमक फलंदाजाची गरज आहे. रिषभ पंत कर्णधारपदासाठी परफेक्ट ऑप्शन आहे. यासह दिल्लीचा माजी प्रशिक्षक रिकी पाँटींगची पंजाब किंग्ज संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

त्यामुळे रिकी पाँटींग त्याला पंजाबमध्ये घेण्यासाठी पूर्ण जोर लावू शकतो. तर दुसरीकडे लखनऊ सुपर जांयट्सचा संघ केएल राहुलला रिलीज करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे लखनऊ सुपर जांयट्सचा संघ कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी जोर लावताना दिसून येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तिलक वर्माची ICC Ranking मध्ये मोठी झेप; पाकिस्तानी फलंदाजाला टॉप ५ मधून बाहेर फेकलं

Maharashtra Live News Update: मंत्री कोकाटेंच्या राजीनामाची चर्चा नाही - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Oscar 2026: करण जोहरच्या 'होमबाउंड'चा ऑस्कर २०२६ मध्ये दबदबा; टॉप १५ चित्रपटांच्या यादीत एन्ट्री

Railway Update: वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार; रेल्वेने नियम बदलले

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; प्रज्ञा सातव यांच्यानंतर आणखी एक नेता साथ सोडणार

SCROLL FOR NEXT