WTC Finals चा विजेता ठरवा- भारताच्या माजी कर्णधाराची मागणी Twitter/ @ICC
Sports

WTC Finals चा विजेता ठरवा- भारताच्या माजी कर्णधाराची मागणी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यापदाच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

INDvsNZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यापदाच्या अंतिम (WTC Finals) सामन्यावर पावसाचे सावट आहे. चार पैकी दोन दिवस तर पावसाची बॅटींग पाहायला मिळाली. पहिल्या दिवशी तर एकही चेंडू टाकला गेला नाही. चौथ्या दिवशीही पावसामुळे खेळाडू मैदावर येऊ शकले नाहीत. भारताचे संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) म्हणाले की ''आयसीसीने डब्लूटीसीचा विजेता कोणाता तरी एक संघ असेल अशी योजना करावी''

गावस्कर यांनी एका हिंदी वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले की, ''आयसीसीने विश्व कसोटी अजिंक्यपदाचा विजेता ठरविण्यासाठी नवा फॉर्म्युला आणायला हवा होता. पुढे गावस्कर म्हणाले डब्लूटीसीचा अंतिम सामना अनिर्णित राहिला तर विजेता निवडण्यासाठी काहीतरी फॉर्म्युला असायला हवा. आयसीसी क्रिकेट समितीने त्याबद्दल विचार केला पाहिजे आणि मग त्याबाबत काही निर्णय घेतला पाहिजे."

इंग्लंडच्या साऊहॅम्प्टन येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात 4 दिवसात केवळ 141.1 षटके खेळली गेली आहेत. आयसीसीने सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवला आहे आणि अशा परिस्थितीत पाचव्या व सहाव्या दिवसाच्या खेळामध्ये सामना निश्चित करावा लागेल. आता ३०८.५ षटके बाकी आहेत जे पुढील दोन दिवसात टाकणे कठीण आहे.

डब्लूटीसीचा अंतिम सामान अनिर्णित राहणार आहे त्यामुळे ही ट्रॉफी दोन्ही संघांमध्ये सामायिक केली जाईल, असे मला वाटत आहे. अंतिम सामन्यात ट्रॉफी अशा प्रकारे सामायिक केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोन दिवसात तीन डाव संपवणे खूपच कठीण आहे. पण जर दोन्ही संघांनी फारच खराब फलंदाजी केली तर तिन्ही डाव पूर्ण होऊ शकतात असे मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.

Edited By : Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT