DC Beat RCB by 60 runs  twitter
Sports

DC vs RCB: शेफाली वर्माच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर दिल्लीचा दिमाखदार विजय! आरसीबीवर 60 धावांनी मात

DC vs RCB: शेफालीने अवघ्या 45 चेंडूत 84 धावांची खेळी केली, याशिवाय मेग लेनिंगनेही 43 चेंडूत 72 धावांची खेळी केली.

Chandrakant Jagtap

WPL 2023: महिला प्रीमियर लीग 2023 च्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोरवर 60 धावांनी विजय मिळवला आहे. दिल्लीची सलामीवीर शेफाली वर्मा आणि कर्णधार मेग लेनिंग यांच्या धडाकेबाच अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने हा विजय मिळवला आहे.

आरसीबीविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शेफाली वर्मा आणि कर्णधार मेग लॅनिंग यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने महिला प्रीमियर लीगमधील आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या उभारली.

दिल्ली संघाने 20 षटकात केवळ 2 गडी गमावून 223 धावा केल्या. शेफालीने 45 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 84 धावा केल्या, तर लॅनिंगने 45 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने 72 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ 20 षटकांत आठ गडी गमावून 163 धावाच करू शकला. (Latest Sports News)

तारा नॉरिसने घेतला स्पर्धेतील पहिला 5 विकेट हॉल

दिल्ली कॅपिटल्सने धडाकेबाज फलंदाजीनंतर 24 वर्षीय तारा नॉरिसच्या आक्रमक गोलंदाजीच्या बळावर आरसीबीवर 60 धावांनी विजय मिळवला. दिल्लीने दिलेल्या 224 धावांच्या विशाल लक्ष्याला प्रत्युत्तर देताना आरसीबी संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 163 धावाच करू शकला.

महिला प्रीमियर लीगमध्ये पहिला पाच विकेट हॉल घेणारी अमेरिकन खेळाडू नॉरिसने चार षटकांत 29 धावा देत पाच बळी घेतले. याशिवाय अॅलिस कॅप्सीने देखील दिल्लीला दोन विकेट मिळवून दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात शरद पवारांना जोरदार धक्का, विश्वासू शिलेदार राजकारणातून निवृत्त

Cancer symptoms risk: कधीही कळून येत नाहीत अशी लक्षणं, वाटतात साधी, पण असतात गंभीर; असू शकतो कॅन्सरचा धोका

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Viral : नवऱ्याची ५००हून अधिक अफेअर्स, वैतागलेल्या बायकोने कॉमिकमधून मांडल्या व्यथा; नेमकं काय प्रकरण? वाचा

Gold Jewellery: सोनार गुलाबी रंगाच्या कागदात सोने गुंडाळून का देतो? यामागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT