Naman Dhir x
Sports

DC VS MI : १, २ नाही तर पळून काढल्या ४ धावा, शेवटच्या चेंडूवर नमन धीर-विल जॅक्सने दिल्लीला अचंबित केले

Naman Dhir : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २०२५ धावा केल्या. या सामन्यात मुंबईची फलंदाजी सुरु असताना शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर नमन धीर आणि विल जॅक्स यांनी धावून ४ धावा काढल्या.

Yash Shirke

अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा महामुकाबला सुरु आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सने २० ओव्हर्समध्ये २०५ धावा केल्या. मुंबईकडून सर्वाधिक धावा तिलक वर्माने काढल्या. तर नमन धीरची छोटी पण आक्रमक खेळी केली.

नमन धीर मुंबई इंडियन्ससाठी हुकमी इक्का ठरला आहे. त्याने मुंबईच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या यांच्यानंतर नमन धीर मुंबईची फलंदाजी लावून धरत असल्याचे पाहायला मिळत आहे. मधल्या ओव्हर्समध्ये खेळताना त्याने खेळ सावरला आहे. परिस्थिती पाहून फलंदाजी करण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे.

दिल्ली विरुद्ध मुंबईच्या आजच्या सामन्यात देखील नमन धीरने त्याचा क्लास दाखवला. त्याने २२३ च्या स्ट्राईक रेटने नमनने १७ बॉल्समध्ये ३८ धावा केल्या. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये मुकेश कुमार गोलंदाजी करत होता. त्याच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर नमनने डीप मिड विकेटच्या दिशेने शॉट मारला. तेव्हा नमन धीर आणि विल जॅक्स तीन धावा करतात. बॉल स्टंपवर थ्रो केला जातो. पण बॉल दुसऱ्या बाजूला वळल्याने नमन आणि विल दोघे पळत चौथी धाव देखील काढतात.

DC VS MI

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

हार्दिक पंड्या (कर्णधार) रोहित शर्मा, रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ -

अक्षर पटेल (कर्णधार), जेक फ्रेजर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT