dc vs lsg delhi capitals beat lucknow super giants rajasthan royals qualified for playoffs royal challeneger bengaluru amd2000 google
Sports

DC vs LSG: दिल्लीच्या विजयाचा राजस्थान अन् बंगळुरूत जल्लोष! लखनऊच्या पराभवाने RCB चा प्लेऑफचा मार्ग मोकळा

DC vs LSG, Match Higlights: आयपीएल २०२४ स्पर्धेतील ६४ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ६४ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी जिंकणं अतिशय महत्वाचं होतं. मात्र या सामन्यात दिल्लीने शानदार कामगिरी केली आणि हा सामना १९ धावांनी जिंकला आहे. या विजयाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघाला मोठा फायदा झाला आहे.

दिल्लीने केल्या २०८ धावा

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेल्या अभिषेक पोरेलने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. तर ट्रीस्टन स्टब्सने नाबाद ५७ धावांची खेळी केली. तर शाई होपने ३८ आणि रिषभ पंतने ३३ धावा करत संघाची धावसंख्या २० षटक अखेर ४ गडी बाद २०८ धावांवर पोहचवली.

लखनऊ सुपर जायंट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०९ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना लखनऊच्या फलंदाजांना हवी तशी सुरुवात करून देता आली नाही. क्विंटन डीकॉक १२ तर केएल राहुल ५ धावांवर बाद होऊन माघारी परतला. मार्कस स्टोइनिस ५ तर दीपक हुड्डा शून्यावर बाद होऊन माघारी परतला. संघ अडचणीत असताना निकोलस पुरनने शानदार खेळी करत २७ चेंडूत ६१ धावा चोपल्या. शेवटी अरशद खानने एकाकी झुंज देत संघाला विजयाच्या जवळ नेलं. मात्र त्याला साथ मिळाली नसल्याने लखनऊला हा सामना गमवावा लागला आहे.

आरसीबीचा मार्ग मोकळा..

लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने १३ सामने खेळले आहेत. यापैकी ७ सामने गमावले आहेत. या संघाचे सध्या १२ गुण आहेत. दिल्लीच्या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा चान्स वाढला आहे. तर राजस्थान रॉयल्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोमवारी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी करा हे 4 सोपे उपाय

Marathi Actor : मराठमोळ्या अभिनेत्याला मातृशोक; कर्करोगाशी झुंज अपयशी, सुनेने शेअर केली भावुक पोस्ट

Maharashtra Live News Update: पुण्यात महाविकास आघाडीच ठरलं! काँग्रेस, शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार

Accident: समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा

Heart attack symptoms: सकाळी बेडवरून उठताच ही ६ लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे; वेळीच डॉक्टरांची घ्या मदत

SCROLL FOR NEXT