DC Vs MI Preview: डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाला आतापर्यंत हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. या संघाने आतापर्यंत सलग ३ सामने गमावले आहेत. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघाला देखील सुर गवसला नाहीये.
पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईचे फलंदाज आणि गोलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. तर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे देखील धावा करण्यात अपयशी ठरले आहेत.
त्यामुळे मुंबईला जर हा सामना जिंकायचा असेल तर या दोघांची बॅट चालणं खूप गरजेचं आहे.
तर दुसरीकडे दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर धावा करतोय, तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत देखील आहे. मात्र त्याचा स्ट्राईक रेट खूप कमी आहे. तर पृथ्वी शॉ देखील तिनही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे.
तर ललित यादव आणि अक्षर पटेल चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले आहे. हे दोघेही मुंबई विरुध्द होणाऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करू शकतात.
दिल्ली कॅपिटल्स विरुध्द मुंबई इंडियन्स पिच रिपोर्ट..
या खेळपट्टीचा फलंदाजांना खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळे हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळू शकतो. तर मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जर १७५ पेक्षा अधिक धावा केल्या.
तर सामना जिंकण्याची शक्यता अधिक आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने जर प्रथम क्षेत्ररक्षणाची निवड केली तर फायदेशीर ठरेल. (Latest sports updates)
अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:
दिल्ली कॅपिटल्स:
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फील सॉल्ट (यष्टिरक्षक), मनीष पांडे, रोमेन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, एनरीच नॉर्खिया, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार.
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन ( यष्टिरक्षक), कॅमेरन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, अर्शद खान, हृतिक शोकिन, पियूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.