David Warner Pushpa Celebration Video twitter
Sports

Viral Cricket Video: 'मै झुकेगा नही साला..', हैदराबादमध्ये दिसला वॉर्नरचा पुष्पा अंदाज ! कॅच पकडताच केलं भन्नाट सेलिब्रेशन

David Warner Pushpa Celebration Video: झेल टिपल्यानंतर डेव्हिड वॉर्नर पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन करताना दिसून आला आहे.

Ankush Dhavre

David Warner Pushpa Celebration:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. या स्पर्धेपूर्वी सराव सामन्यांचा थरार सुरू आहे. मंगळवारी (३ ऑक्टोबर) पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सराव सामन्याचा थरार पार पडला.

या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारत ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा मजेशीर अंदाज पाहायला मिळाला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (David Warner Celebration)

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन चाहता आहे. आपल्या सोशल मीडियावर तो अनेकदा अल्लू अर्जुनच्या गाण्यावर डान्स करताना आणि अभिनय करताना दिसून आला आहे.

नुकताच पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात झेल टिपल्यानंतर तो पुषा स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करताना दिसून आला आहे. (Latest sports updates)

तर झाले असे की, पाकिस्तानची फलंदाजी सुरू असताना १२ वे षटक सुरू होते. हे षटक टाकण्यासाठी सीन ॲबोट गोलंदाजीला आला होता. त्यावेळी फलंदाजी करता असलेल्या अब्दुल्ला शफीकने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. चेंडू हवा तसा बॅटवर न आल्याने, चेंडू जास्त लांब गेला नाही. डेव्हिड वॉर्नरने सोपा झेल टिपला आणि त्याला पॅव्हेलियनची वाट दाखवली.

हा झेल टिपल्यानंतर डेव्हिड वॉर्नर अल्लु अर्जुनच्या पुष्पा चित्रपटातील मै झुकेगा नही साला.. ही स्टेप करताना दिसून आला. वॉर्नरच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायला होऊ लागला आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३१५ धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला ३३७ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात १४ धावांनी विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT