D gukesh saam tv
Sports

D Gukesh: डी गुकेश बनला ६४ घरांचा राजा! जगज्जेत्यावर टीम इंडियाकडून कौतुकाचा वर्षाव

Shubman Gill Congratulate D Gukesh: भारताचा युवा बुद्धिबळपटू डी गुकेशने वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये चीनच्या डिंग लीरेनला पराभूत केलंय. दरम्यान या विजयानंतर भारतीय संघाचा खेळाडू शुभमन गिलने त्याचं कौतुक केलं आहे.

Ankush Dhavre

भारताचा युवा बुद्धिबळपटू डी गुकेशने कोट्यावधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी झालेल्या सामन्यात डी गुकेशचा सामना चीनच्या डिंग लीरेनसोबत झाला. या सामन्यात डी गुकेशने डिंगचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं.

यासह तो वर्ल्ड चॅम्पियनशिपचा खिताब पटकावला. यासह तो सर्वात युवा वर्ल्ड चॅम्पियन बनला. या शानदार कामगिरीनंतर त्याच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव केला जातोय. दरम्यान भारतीय क्रिकेट संघानेही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

गिलने केलं कौतुक

उद्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्याला सुरुवात होणार आहे .या सामन्याच्या एक दिवसापूर्वी गिलने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याला डी गुकेश बाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला, ' संपूर्ण भारतीय संघाकडून त्याला शुभेच्छा. सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन बनल्यामुळे त्याचं खूप खूप कौतुक.'

गुकेश हा वर्ल्ड चॅम्पियनशिपचा खिताब पटकावणारा दुसराच भारतीय ठरला आहे. यापूर्वी ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी हा खिताब पटकावला होता.

मुख्य बाब म्हणजे, गुकेशने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी हा खिताब पटकावण्याचा कारनामा करुन दाखवला आहे. फायनलमध्ये विजय संपादन करताच, गुकेशला अश्रू अनावर झाले. तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते.

या सामन्यात तो काहीवेळा बॅकफूटवर गेला. मात्र त्याने कमबॅक करायलाही फार वेळ घेतला नाही. त्याचा विरोधी खेळाडू असेलेल्या लिरेनकडे बराच अनुभव होता. २०२३ मध्ये त्याने रशियाच्या इयान नेपोमनियाचीविरोधात बाजी मारली होती.

गतवर्षी त्याने चॅम्पियन होण्याचा मान पटकावला होता. त्याला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याची संधी होती. मात्र गुकेशने ही संधी हिसकावून घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT