Chennai Super Kings Vs Rajasthan Royals : आयपीएलचा 17वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स (CSK Vs RR) यांच्यात चेन्नई येथे खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 175 धावा केल्या. देवदत्त पडिक्कल आणि जॉस बटलर यांनी केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर राजस्थानला सन्मानजनक स्कोअर गाठता आला.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सला सुरुवातीलाच मोठा झटका बसला. तुषार देशपांडेच्या चेंडूवर चांगल्या फॉर्मध्ये असलेला यशस्वी जैस्वाल अवघ्या 10 धावा करून बाद झाला. त्यानंतर जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल यांनी सांघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. दोघांनी जबरदस्त खेळी करत संघाचा डाव सावरला. मात्र 38 धावांवर खेळत असताना जडेजाने पडिक्कला बाद केले आणि संघाला दुसरी विकेट मिळवून दिली.
यानंतर राजस्थानचा स्कोरबोर्ड स्लो झाला. त्यानतंर जोस बटलर एकीकडून संघाची खिंड लढवत असताना दुसऱ्या टोकाकडून रविचंद्रन अश्विनने 22 चेंडूत 30 आणि शिमरून हेटमायरने 18 चेंडूत 30 धावा करून संघाला सन्मानजक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. त्याने 36 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. (Latest Sports News)
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन):
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, कुलदीप सेन, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन):
डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), सिसांडा मगला, महेश थिकशन, तुषार देशपांडे, आकाश सिंग
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.