CSK vs PBKS IPL Match Result IPL/Twitter
क्रीडा

CSK vs PBKS IPL Match Result: शेवटच्या षटकात फिरला सामना; रोमहर्षक सामन्यात पंजाबची चेन्नईवर मात

CSK vs PBKS IPL Match Result:पंजाबच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत चेन्नईवर ४ गडी राखून विजय मिळवला.

Vishal Gangurde

CSK vs PBKS IPL Match Result: चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्समध्ये आज ४१ वा सामना झाला. चेन्नईने पंजाबला २०१ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा सामना करण्यासाठी उतरलेल्या पंजाबच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत चेन्नईवर ४ गडी राखून विजय मिळवला. (Latest Marathi News)

पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेला ४१ सामना रोमहर्षक झाला. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. पंजाबच्या सिंकदरने कमाल करत शेवटच्या चेंडूत ३ धावा पळून काढत संघाला विजय मिळवून दिला. पंजाबच्या या विजयात प्रभसिमरन सिंग आणि लिम लिव्हिंगस्टोन यांनी मोलाचा वाटा उचलला.

पंजाबच्या प्रभसिमरने फटकेबाजी करत संघाला ८ षटकात ८० धावापर्यंत पोहोचवले. मात्र, ४२ धावांवर जडेजाने प्रभसिमरनला बाद केले. त्यानंतर जडेजाने अथर्व तायडेला माघारी परतवलं. यामुळे पंजाबची अवस्था ३ बाद ९४ धावा अशी झाली होती.

पुढे लिम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन यांनी संघाची कमान सांभाळली . मात्र, तुषार देशपांडेने ४० धावांवर लिव्हिंगस्टोनला बाद केले. यानंतर करनही २९ धावांवर बाद झाला. जितेश शर्माने १० चेंडूत २१ धावा चोपत १९ व्या षटकात संघाला १८६ धावांपर्यंत पोहचवले.

त्याला पुढे तुषार देशपांडेने २१ धावांवर बाद केले. यानंतर पंजाबला १ चेंडू ३ धावा हव्या होत्या. सिकंदरने पथिरानाच्या शेवटच्या चेंडूवर ३ धावा पळून काढत पंजाबला विजय मिळवून दिला.

पंजाबला सामना जिंकण्यासाठी ३ तर सामना सुपर ओव्हरमध्ये नेण्यासाठी २ धावांची गरज होती. पंजाबचा सिकंदर रझा स्ट्राईकवर होता. सिकंदरने पथिरानाच्या शेवटच्या चेंडूवर ३ धावा पळून काढत पंजाबला विजय मिळवून दिला.

चेन्नईने केल्या होत्या २०० धावा

ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉन्व्हेने मिळून चेन्नई सुपर किंग्ज संघाला चांगली सूरूवात करून दिली. दोघांनी मिळून ८६ धावांची भागीदारी केली. ऋतुराज गायकवाड ३७ धावांची खेळी करून माघारी परतला.

तर डेवोन कॉन्व्हेने नाबाद ९२ धावांची खेळी केली तर आक्रमक फलंदाज शिवम दुबेने २८ धावांचे योगदान दिले. शेवटी फलंदाजीला आलेल्या एमएस धोनीने सलग २ चेंडूंमध्ये २ षटकार मारत नाबाद १३ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT