CSK vs LSG Saam Digital
क्रीडा

CSK vs LSG : लखनौचा चेन्नईवर ८ गडी राखून दणदणीत विजय; के. एल. राहुल, डी कॉकची धमाकेदार अर्धशतकं

IPL 2024/CSK vs LSG : अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर लखनौ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये आयपीएलचा सामना झाला. लखनौने हा सामना के. एल. राहुल आणि क्विंटन डी कॉक यांच्या धमाकेदार अर्धशतकांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जवर 8 गडी राखून दणदणीत वियज मिळवला.

Sandeep Gawade

अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर लखनौ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये आयपीएलचा सामना झाला. लखनौने हा सामना के. एल. राहुल आणि क्विंटन डी कॉक यांच्या धमाकेदार अर्धशतकांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जवर 8 गडी राखून दणदणीत वियज मिळवला. के. एल. राहुलने ८२ धावा केल्या त्यांने ५३ चेंडून ९ चौकार आणि ३ षटकार ठोकले. धावा केल्या तर डी कॉकने ४३ चेंडून ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५४ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने १७६ धावा करून १७७ धावांच लक्ष्य लखनौसमोर ठेवलं होतं.

केएल राहुल ५३ चेंडूत ८२ धावा करून बाद झाला. पाथीरानाने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रवींद्र जडेजाने त्याचा एका हाताने झेल टिपला. डी कॉकने शानदार फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र यानंतर तोही बाद झाला. डी कॉक ४३ चेंडूत ५४ धावा करून बाद झाला. मुस्तफिझूर रहमानने डी कॉकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर निकोलस पुरन आणि मार्कस स्टॉयनिस यांनी संघाला विजय मिळवून दिला.

लखनौने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने १७७ धावांच लक्ष्य लखनौसमोर ठेवलं आहे. चेन्नईचा निम्मा संघ ९५ धावाचं तंबूत परतला होता, मात्र अखेरच्या षटकांमध्ये धोनीने आणि अजय जडेजाने पुन्हा एकदा तुफानी खेळी करत संघाला मजबूत धावसंख्या उभारण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. लखनौ सुपरजायंट्सने आयपीएल 2024 मध्ये चांगली सुरुवात केली होती मात्र शेवटचे दोन सामने गमावले आहेत. आज पुन्हा संघाला विजयाचा सूर गवसला आहे. तर चेन्नई सुपर किंग्जकने 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT