चेन्नईच्या मैदानावर आज ऋतुराज गायवाड मार्कस स्टोयनीस यांची दोन वादळी शतकं पहायला मिळाली. मार्कस स्टोयनीने केवळ ६३ चेंडून १२४ धावा ठोकत संघाला विजय मिळवून दिला आहे. तर ऋतुराज गायवाडने ६० चेंडूत १०८ धावा केल्या मात्र चेन्नईच्या संघाला होम ग्राऊंडवर पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. चेन्नईने २०९ धावा करत २०१० धावांच लक्ष्य लखनौसमोर ठेवलं होतं. लखनौने हे लक्ष्य ३ चेंडू राखून अगदी सहज पार केलं. चेन्नईच्या लागोपाठ दोन शतक पाहण्याची संधी क्रिकेट चाहत्यांनी मिळाली.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध लखनौला शेवटच्या षटकात १७ धावांची गरज होती. शेवटचे षटक मुस्तफिझूर रहमानने टाकले आणि मार्कस स्टॉइनीस स्ट्राइकवर होता. या खेळाडूने अवघ्या 3 चेंडूत लखनौला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मार्कस स्टॉइनिसने षटकार ठोकला. या खेळाडूने दुसऱ्या चेंडूवर जबरदस्त चौकार मारला. यानंतर स्टॉइनिसने तिसऱ्या चेंडूवर पुन्हा चौकार मारला आणि हा चेंडू नो बॉल ठरला. यानंतर स्टोइनिसने फ्री हिटवरही चौकार मारून लखनौला विजय मिळवून दिला.
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना झाला. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सीएसकेच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायवाडचं शतक आणि शिवम दुबेच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईच्या संघाने २० षटकात ४ विकेट गमावत २१० धावा केल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.