csk vs kkr  saam tv
Sports

IPL 2023 Points Table: गुजरातला मागे सोडत CSK करणार Playoff मध्ये प्रवेश?पाहा काय आहे समीकरण

CSK vs KKR Match Prediction: आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत

Ankush Dhavre

CSK VS KKR IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता चेन्नईच्या चेपॉक मैदानावर रंगणार आहे.

गेल्या सामन्यात विजय मिळवणारा चेन्नईचा संघ या सामन्यात देखील विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

तर दुसरीकडे गेल्या सामन्यात पराभूत झालेला कोलकाता नाईट रायडर्स संघ पराभव विसरून जोरदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये होणार मोठा उलटफेर..

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ १५ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. या संघाने १२ सामन्यांपैकी ७ सामने जिंकले आहेत. तर ४ सामने गमावले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला होता.

जर आज होणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने विजय मिळवला तर १७ गुणांसह चेन्नईचा संघ अव्वल स्थानी विजराजमान होणार आहे. गुजरातला मागे सोडत चेन्नईला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी असणार आहे. (Latest sports updates)

कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी करो या मरो सामना..

कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी हा सामना करो या मरो सामना असणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने जर हा सामना गमावला तर हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी हे आव्हान सोपं मुळीच नसणार आहे. कारण हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे. या मैदानावर चेन्नईचा रेकॉर्ड देखील दमदार आहे. यापूर्वी जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

त्या सामन्यात अजिंक्य रहाणेने तुफानी अर्धशतक झळकावले होते. एकीकडे चेन्नईचा संघ जोरदार फॉर्ममध्ये आहे. तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ संघर्ष करताना दिसून येत आहे.

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११ :

चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, एमएस धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना, मथीशा पाथीराना

कोलकाता नाईट रायडर्स: रहमानउल्ला गुरबाज, जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, डेव्हिड विसे, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजूनपर्यंत कोणताही प्रस्ताव नाही; ठाकरे बंधूंच्या आघाडीवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया|VIDEO

Maharashtra Live News Update: मित्रपक्षांकडून सन्मानाने जागा न मिळाल्यास स्वबळावर लढून संघर्ष करा ! मंत्री हसन मुश्रीफ यांचा नारा

Winter Health Tips : हिवाळ्यात हाताला वारंवार घाम येतोय? लगेच करा 'हे' घरगुती उपाय

Banana Farmers In Crisis: केळी उत्पादक संकटात; हजारो टन केळी शेतातच सडली|VIDEO

Accident News : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, ४० प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT