csk vs kkr ipl 2024 ravindra jadeja completed 100 catches in ipl amd2000 twitter
Sports

Ravindra Jadeja Record: KKR विरुद्ध जडेजाचं खास शतक! विराट- रोहितच्या यादीत मिळवलं स्थान

Ravindra Jadeja Catch Record News: या सामन्यात रविंद्र जडेजाच्या नावे एका खास रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

CSK vs KKR, Ravindra Jadeja Record:

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला २० षटकअखेर ९ गडी बाद २३७ धावा करता आल्या. तुफान फॉर्ममध्ये असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विजयरथ रोखण्यात रविंद्र जडेजाने मोलाची भूमिका बजावली.

ज्यावेळी कोलकाता नाईट रायडर्स संघातील फलंदाज पावरप्लेमध्ये पाया रचून मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करत होते. त्यावेळी जडेजाने ३ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. यादरम्यान त्याने १ झेल टिपताच त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

रविंद्र जडेजा आपल्या लयदार गोलंदाजी, विस्फोटक फलंदाजीसह उत्कृष्ट क्षेत्र रक्षणासाठीही ओळखला जातो. जडेजाच्या हातात चेंडू गेला की तो फेव्हिकॉलसारखा चिपकतो. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ३ गडी बाद करण्यासह ३ झेलही टिपले. यासह त्याने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात १०० झेल टिपण्याचा कारनामा केला आहे.

रविंद्र जडेजा हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात १०० किंवा त्यापेक्षा अधिक झेल टिपणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. हा कारनामा त्याने २३१ व्या सामन्यात केला आहे. यापूर्वी विराट कोहलीने ( ११०), सुरेश रैनाने (१०९), कायरन पोलार्ड ( १०३), आणि रोहित शर्माने (१००) आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक झेल टिपले आहेत. शिखर धवनला देखील आयपीएल स्पर्धेत १०० झेल पूर्ण करण्याची संधी आहे. धवन हा भारतीय संघातील अनुभवी खेळाडू असून त्याने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत ९८ झेल टिपले आहेत. (Cricket news in marathi)

असा राहिलाय रविंद्र जडेजाचा रेकॉर्ड...

रविंद्र जडेजा हा देखील आयपीएल स्पर्धेतील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. तो २००८ पासून आयपीएल खेळतोय. यादरम्यान त्याने २३१ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने २७७६ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना त्याने १५६ गडी बाद केले आहेत. तो या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत नवव्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

Mumbai : मुंबईत हवालदारानं स्वत:ला संपवलं, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

कुलूपबंद मदिरा, रोखल्या नजरा,मद्यपींचे होणार वांदे, सोमवारी ड्राय डे?

SCROLL FOR NEXT