CSK VS KKR MS Dhoni x
Sports

CSK VS KKR : धोनीच्या हाती पुन्हा कमान; पण संघाचं निराशाजनक काम, केकेआरनं चेन्नईच्या खेळाडूंना दाखवलं आस्मान

CSK VS KKR Highlights : चेपॉक स्टेडियममध्ये सीएसके विरुद्ध केकेआर या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना चेन्नईच्या फलंदाजांनी कोलकाताच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. २० ओव्हर्समध्ये सीएसकेने १०३ धावा केल्या.

Yash Shirke

कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सला त्याच्याच घरच्या मैदानात लोळवले आहे. केकेआरच्या गोलंदाज सीएसकेच्या फलंदाजांवर भारी पडले. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने १०३ धावांवर गाशा गुंडाळला आहे. एका प्रकारे, अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून गोलंदाजी निवडून सामनाच जिंकला असे म्हटले जात आहे. आता कोलकातासमोर १०४ धावांचे आव्हान आहे.

एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना खेळला गेला. या सामन्यात कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० ओव्हर्समध्ये फक्त १०३ धावा केल्या. सामन्यामध्ये केकेआरच्या गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला.

रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे सलामीला आले. रचिन ४ धावांवर, कॉनवे १२ धावांवर बाद झाला. राहुल त्रिपाठीने १६ धावा केल्या. विजय शंकर २९ धावांवर परतला. रविचंद्रन अश्विनने १ धाव काढली. जडेजा आणि दीपक हूडा शून्यावर तंबूत परतले. महेंद्रसिंह धोनी सुद्धा १ धाव करुन आउट झाला. शिवम दुबेने सर्वाधिक नाबाद ३१ धावा केल्या. दुबेमुळे चेन्नईची धावसंख्या १०० पार गेली.

चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ -

डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, रचिन रवींद्र, शिवम दुबे, विजय शंकर, रवींद्र जड़ेजा, एमएस धोनी (कर्णधार), आर अश्विन, नूर अहमद, अंशुल कंबोज, खलील अहमद, मथीशा पथिराना.

कोलकाता नाईट रायडर्सची प्लेईंग ११ -

क्विंटन डी कॉक, सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मोइन अली, हर्षित राणा, वैभव अरोडा, वरुण चक्रवर्ती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT