CSK VS DC Saam Tv
Sports

CSK vs DC Match Prediction: आज CSK अन् DC येणार आमने सामने! CSK ला प्लेऑफमध्ये जाण्याची नामी संधी; पाहा कसे असेल प्लेऑफचे समीकरण

CSK vs DC Match Details: हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

Ankush Dhavre

CSK VS DC IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ५५ वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने मुंबई इंडियन्स संघावर जोरदार विजय मिळवला होता.

तर दिल्ली कॅपिटल्स संघाने राजस्थान रॉयल्स संघावर विजय मिळवला होता. चेन्नईचा संघ १३ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर ८ गुणांसह दिल्लीचा संघ सर्वात शेवटी आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

या सामन्याबद्दल अधिक माहिती (CSK vs DC Match Details)

सामना: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

सामन्याची वेळ : १० मे २०२३, संध्याकाळी ७:३० वाजता.

सामन्याचे ठिकाण: एमए चिदंबरम स्टेडियम

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स पिच रिपोर्ट (CSK vs DC Pitch Report)

एमए चिदंबरमची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. या हंगामात फलंदाजांना देखील या खेळपट्टीतून मदत मिळाली आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

या सामन्यात अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग 11 (CSK vs DC Playing 11)

चेन्नई सुपर किंग्ज (CSK Playing 11):

ऋतुराज गायकवाड़, डेवोन कॉनव्हे, अजिंक्य रहाणे, मोइन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), दीपक चाहर, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे, महिश थिक्षणा

दिल्ली कॅपिटल्स (DC Playing 11):

फिलिप सॉल्ट, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), राइली रूसो, मनीष पांडे. अक्षर पटेल, अमन खान, रिपल पटेल, मुकेश कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, खलील अहमद. (Latest sports updates)

चेन्नई आणि दिल्लीचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार का?

सध्या चेन्नई सुपर किंग्ज संघ १३ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. जर चेन्नईने आजच्या सामन्यात विजय मिळवला तर चेन्नईचे १५ गुण होतील. चेन्नईचे ३ सामने शिल्लक आहेत. ३ पैकी २ सामने जरी जिंकले. तरी चेन्नईचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो.

तर दिल्ली कॅपिटल्स बद्दल बोलायचं झालं तर, ८ गुणांसह सर्वात शेवटी आहे. दिल्लीचे अजूनही ४ सामने शिल्लक आहेत. दिल्लीने जर चारही सामने जिंकले तर १६ गुण होतील. मात्र दिल्लीचा नेट रन रेट कमी आहे. इतर संघ देखील १६ गुणांनी प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात. अशा वेळी दिल्लीचा संघ नेट रन रेटमुळे बाहेर होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT