CSK vs DC: गुरु समोर शिष्य! आजचा सामना नंबर-1 होण्यासाठी Twitter/ @DC
Sports

CSK vs DC: गुरु समोर शिष्य! आजचा सामना नंबर-1 होण्यासाठी

आयपीएल 2021 (IPL 2021) चा 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs DC) यांच्यात होणार आहे.

वृत्तसंस्था

आयपीएल 2021 (IPL 2021) चा 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs DC) यांच्यात होणार आहे. आज होणाऱ्या या सामन्यात चेन्नईचा संघ मागच्या पराभवाचा बदला घेईल. या हंगामात, जेव्हा दोघांचा आधी सामना होता, तेव्हा दिल्लीने विजय मिळवला होता. दुबईमध्ये होणाऱ्या या सामन्यामुळे कोणता संघ गुणतालिकेत अव्वल असेल हे जवळपास स्पष्ट होईल.

मागच्या सामन्यात चेन्नईला पराभव स्वीकारावा लागला होता. या दोन्ही संघांनी या आयपीएलवर आतापर्यंत वर्चस्व गाजवले आहे आणि अशा स्थितीत हा सामना अत्यंत रोमांचक होण्याची शक्यता आहे. यूएई मध्ये दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक सामना गमावला आहे. दोन्हीही संघांना पहिल्या क्रमांकावर जाण्याची नामी संधी आहे.

गेल्या हंगामात निराशाजनक कामगिरी करणारा चेन्नईचा संघ यावेळी प्लेऑफ मध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला शनिवारी राजस्थान रॉयल्सच्या शानदार कामगिरीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चेन्नईने चार बाद 189 धावा केल्या पण यशवी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्या शानदार खेळीमुळे या मजबूत धावसंख्येचा बचाव करता आला नाही. रॉयल्सने 17.3 षटकांत धावांचा डोंगर पार केला. चेन्नईच्या संघातील फाफ डू प्लेसीस, ऋतुराज गायकवाड जबरदस्त फॅार्ममध्ये आहेत. तर दुसरीकडे दिल्लीचे गोलंदाज आणि फलंदाज फॅार्म मध्ये आहेत.

चेन्नई संभाव्य संघ

ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसीस, सुरेश रैना, अंबाती रायडू, एम एस धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक), रविंद्र जडेजा, डेव्न बाव्रो, शार्दुल ठाकूर, दिपक चहर, जोस हेजलवुड, सॅम करन.

दिल्ली संभाव्य संघ

शिखर धवन, पृश्वी शॅा, श्रेयश अय्यर, शिमरन हेटमासर, स्टिव्ह स्थित, अक्सर पटेल, कगिसो रबाडा, एनरिक नोर्टजे, आवेश खान, रविचंद्रन आश्विन, ललित यादव.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बारामतीत ठरलं, तुतारी-घड्याळ झेडपीलाही एकत्र

Navi Mumbai Result: नवी मुंबईत भाजपची एकहाती सत्ता, कोणत्या वॉर्डमधून कोण जिंकले? वाचा विजयी उमेदवारांची यादी

Success Story: फुटपाथवर आईने कष्ट केले, पोरानं आज वर्दी चढवली! नोकरी लागताच गोपाळ आईपुढे नतमस्तक; काळजाला भिडणारा व्हिडिओ

Loneliness Health Impact: एकटेपणामुळे तुम्हाला होऊ शकतात इतके आजार; पाहा कशी दिसून येतात याची लक्षणं

Gold Rate Today : सराफा बाजार उघडताच सोनं महागलं, वाचा २२k-२४k ची लेटेस्ट किंमत...

SCROLL FOR NEXT