csk trophy saam tv
क्रीडा

CSK Trophy : देव पावला! IPL जिंकताच चेन्नईची ट्रॉफी पोहोचली तिरुपतीच्या चरणी -VIDEO

CSK Trophy At Tirupati Temple: या विजयानंतर आयपीएलच्या ट्रॉफीची तिरुपती चरणी पुजा करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना नुकताच पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामन्यात शेवटच्या चेंडूवर रवींद्र जडेजाने चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यासह चेन्नई सुपर किंग्ज संघाने पाचव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे.

दरम्यान या विजयानंतर आयपीएलच्या ट्रॉफीची तिरुपती चरणी पुजा करण्यात आली आहे.

तिरुपती चरणी आयपीएलची ट्रॉफी..

चेन्नई सुपर किंग्ज संघाने जोरदार कामगिरी करत पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. ही ट्रॉफी जिंकल्यानंतर चेन्नईचा संघ अहमदाबादमधून चेन्नईला रवाना झाला. चेन्नई एअरपोर्टवरून ही ट्रॉफी थेट चेन्नईतील प्रतिष्ठीत तिरुपती मंदिरात नेण्यात आली.

यावेळी चेन्नई सुपर किंग्ज संघातील एकही खेळाडू उपस्थित नव्हता. या ट्रॉफीचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या पूजेसाठी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी देखील हजेरी लावली होती. (Latest sports updates)

चेन्नई सुपर किंग्ज संघावर २ वर्षांसाठी बंदी घातली गेली होती. त्यानंतर २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने कमबॅक करत ट्रॉफी जिंकली होती. या विजयानंतर चेन्नईतील तिरुपती मंदिरात ट्रॉफीची पूजा करण्यात आली होती. त्यानंतर ही परंपरा सुरु झाली.

या सामन्याबद्द्ल बोलायचं झालं तर रविवारी (२८ मे) हा सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता. त्यामुळे रिझर्व्ह डे म्हणजेच सोमवारी (२९ मे) हा सामना खेळवला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजयासाठी १५ षटकात १७१ धावांची गरज होती.

हा सामना शेवटच्या चेडूपर्यंत गेला होता. शेवटच्या २ चेंडूंवर १० धावांची गरज होती. त्यावेळी रवींद्र जडेजाने पाचव्या चेंडूवर षटकार आणि अंतिम चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

SCROLL FOR NEXT