Ajinkya Rahane Catch Saam tv
Sports

Ajinkya Rahane Catch Video : जबरदस्त! आरसीबीविरुद्ध सामन्यात अंजिक्य रहाणेने घेतली विराटची अफलातून कॅच

Ajinkya Rahane Catch News : एमएस चिदंबरम स्टेडियममध्ये सुरु असलेल्या रोमांचक सामन्यात अंजिक्य रहाणेने विराट कोहलीची घेतलेल्या कॅचची क्रिकेट चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. अंजिक्य रहाणेच्या अफलातून कॅचचं नेटकऱ्यांकडून तोंडभरून कौतुक होत आहे.

Vishal Gangurde

CSK vs RCB IPL 2024 Updates:

आज शुक्रवारी आयपीएलचा १७ वा हंगाम सुरु झाला आहे. आयपीएलच्या या हंगामात पहिला सामना चैन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु या दोन्ही संघामध्ये सुरु आहे. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात आरसीबीचे फलंदाज तुफान फॉर्ममध्ये दिसत आहेत. एमएस चिदंबरम स्टेडियममध्ये सुरु असलेल्या रोमांचक सामन्यात अंजिक्य रहाणेने विराट कोहलीची घेतलेल्या कॅचची क्रिकेट चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. अंजिक्य रहाणेच्या अफलातून कॅचचं नेटकऱ्यांकडून तोंडभरून कौतुक होत आहे. (Latest Marathi News)

आरसीबीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफने संघासाठी चांगली सुरुवात करून दिली. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या आरसीबीच्या फलंदाजांसमोर चेन्नईचेही गोलंदाज भेदक मारा टाकत होते. या सामन्यात विराट झेलबाद झाला.

विराट कोहलीचा कॅच चेन्नईच्या दोन खेळाडूंनी पकडला. लेग साईडला फिल्डिंगसाठी उभ्या असलेल्या रहाणने झेल पकडत विराट कोहलीला घरचा रस्ता दाखवला. अंजिक्य रहाणे आणि रचिन रवींद्र या दोघांनी मिळून विराटचा झेल घेतला.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दीपक चहरच्या गोलंदाजीवर विराटने लेग साईडला जोरदार फटका लगावला. मात्र, विराटला फटका मारताना टायमिंग साधता आला नाही. विराटचा चेंडू थेट सीमा रेषेवर उभ्या असलेल्या अंजिक्य रहाणे जवळ मारला. रहाणेने झेल घेतल्यानंतर त्याचा तोल ढासळत होता. त्यामुळे त्याने तातडीने चेंडू रचिन रवींद्र जवळ फेकला. त्यानंतर रचिनने सहज कॅच घेतला.

कोहली १२ व्या षटकात आरसीबीच्या ७७ धावा असताना बाद झाला. तब्बल दोन महिन्यानंतर क्रिकेट सामना खेळण्यासाठी उतरलेल्या विराटने २० चेंडूत १ षटकाराच्या मदतीने २१ धावा कुटल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT