Chennai Super Kings SAAM TV
Sports

IPL 2026: लखनऊविरूद्धच्या पराभवाने सीएसकेचा खेळ फिस्कटला; चेन्नई कशी पोहोचणार प्लेऑफमध्ये?

Chennai Super Kings IPL 2026 Playoff Equation: लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्ध पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. गुजरात टायटन्स प्लेऑफच्या उंबरठ्यावर पोहोचली असून राजस्थान आणि पंजाब यांच्यात चौथ्या स्थानासाठी चुरशीची स्पर्धा सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

शुक्रवारी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यामध्ये सामना खेळवला गेला. या सामन्यात पॉईंट्स टेबलच्या तळाशी असलेल्या लखनऊने चेन्नईचा पराभव केला. दरम्यान या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्सचा प्लेऑफचा मार्ग काहीसा खडतर झाला आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये सीएसकेची घसरण

पॉईंट्स टेबलमध्ये सीएसकेला फटका बसला आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीम पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरलीये. आता प्रश्न असा निर्माण होतो की, चेन्नई अजूनही प्लेऑफसाठी पात्र ठरू शकेल का?

एलएसजीविरुद्धच्या सामन्यापूर्वी सीएसकेच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची ४७ टक्के होती. मात्र आता ती शक्यता २८.४ टक्क्यांवर आलीये. या सामन्यात लखनऊला हरवून पंजाब किंग्सला बाहेर काढण्याची आणि आयपीएल २०२६ च्या पॉईंट्स टेबलमध्ये टॉप ४ मध्ये येण्याची चेन्नईकडे चांगली संधी होती. पण लखनऊविरूद्धच्या पराभवाने त्यांना मोठा धक्का बसला आहे. सीएसकेच्या या पराभवामुळे पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्सच्या आशा अजूनही जिवंत आहेत.

स्टार स्पोर्ट्सच्या आकडेवारीनुसार, आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची गुजरात टायटन्सची शक्यता सर्वाधिक आहे. गुजरातचा आजचा सामना केकेआरविरुद्ध आहे. जर शुभमन गिलच्या टीमने हा सामना जिंकला तर ती प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारी पहिली टीम असणार आहे. गुजरातच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता सध्या ९८ टक्के आहे.

गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू सध्या दुसऱ्या स्थानावर असून त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता ९६.१ टक्के आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबाद असून त्यांची प्लेऑफ गाठण्याची शक्यता ७०.३ टक्के शक्यता आहे.

आयपीएल २०२६ च्या प्लेऑफसाठी पात्र ठरण्याचा चौथा दावेदार पंजाब किंग्स नसून राजस्थान रॉयल्स आहे. आकडेवारीनुसार, राजस्थान रॉयल्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता ५१.६ टक्के आहे, तर पंजाबची शक्यता ४८.८ टक्के आहे.

दिल्ली आणि केकेआरची परिस्थिती कशी?

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्सबद्दल या स्पर्धेतून बाहेर पडल्यातच जमा आहे. डीसीच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता ३.१ टक्के आहे आणि केकेआरची ३.६ टक्के आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT