Angelo Mathews Timed Out twitter
Sports

Angelo Mathews Timed Out: अँजेलो मॅथ्यूज आऊट होता का? सोशल मीडियावर पेटला वाद; दिग्गज क्रिकेटपटूंनी दिल्या अशा प्रतिक्रिया

Cricketers Reaction On Angelo Mathews Timed Out: अँजेलो मॅथ्यूजच्या विकेटनंतर दिग्गज खेळाडूंनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Ankush Dhavre

Cricketers Reaction On Angelo Mathews Timed Out:

दिल्लीच्या मैदानावर इतिहास घडला आहे. क्रिकेटच्या १४६ वर्षांच्या इतिहासात कुठलाही फलंदाज टाईम आऊट झाला नव्हता. मात्र बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात शाकिब अल हसनने मागणी केल्यानंतर अँजेलो मँथ्यूजला टाईम आऊट करण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणावर अनेक दिग्गज खेळाडूंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय घडलं?

तर झाले असे की, बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने सदीरा समरविक्रमाला बाद केलं. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजी करण्यासाठी आला होता. पहिल्या चेंडूचा सामना करण्यापूर्वी त्याच्या हेल्मेटचा स्ट्रॅप तुटला.

त्यामुळे त्याला पहिला चेंडू खेळण्यास उशीर झाला.त्यावेळी शाकिब अल हसनने टाईम आऊटची अपील केली. अंपायरनेही त्याला बाद घोषित केलं. यासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट होणारा जगातील पहिलाच फंलदाज ठरला. दरम्यान या विकेटनंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest sports updates)

सोशल मीडियावर आता अँजेलो मॅथ्यूज आऊट होता की नॉट आऊट असा वाद पेटला आहे. या प्रकरणावर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, डेल स्टेन मोहम्मद हाफीज आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाने ट्वीट करत आपलं मत मांडलं आहे.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने ट्वीट करत लिहिले की, 'अतिशय खेदजनक!दिल्लीत आज काय घडलं..' तर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू डेल स्टेनने ही कृत्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिजने ही ट्वीट करत आपलं मत मांडलं आहे. त्याचं म्हणणं आहे की,खेळाचा दर्जा राखायला हवा...'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT